कॉँग्रेसवरच नव्हे देशावर उपकार करा, गांधी कुटुंबाने राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रामचंद्र गुहा यांचे रोखठोक मत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केवळ काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठीच नव्हे तर भारतीय लोकशाहीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गांधी कुटुंबाने केवळ नेतृत्व सोडायला पाहिजे असे नाही तर राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे असे रोखठोक मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनतेला घराणेशाहीतून आलेले नव्हे तर सेल्फमेड नेते आवडतात असेही त्यांनी म्हटले आहे.Do good not only to the Congress but also to the country, the Gandhi family should retire from politics, says Ramchandra Guha

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना करण थापर यांनी रामचंद्र गुहा यांची द वायर या संकेस्थळावर मुलाखत घेतली. गुहा म्हणाले, गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी या तिघांनीही राजकारणातून निवृत्त व्हायला हवे. भारतात हिंदूत्व हुकूमशाही येण्यास केवळ तीन गंधीच जबाबदार आहेत. तेच मुख्य गुन्हेगार आहेत. ते पुन्हा कधीही दिल्लीत सत्तेवर येणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांचा लोकांशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.



गुहा म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा सदस्य नाही. मी फक्त भाष्यकार आणि निरीक्षक आहे. त् त्यांना काय करायचे आहे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची प्रचंड घसरण सुरू झाली आहे. पाच राज्यांतील झालेल्या दारुण पराभवातून हे स्पष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे ते पक्षाचे नेतृत्व करण्याच्या कामासाठी अयोग्य आहेत.

त्यामुळे काँग्रेसला स्वत:ला पुन्हा जिवंत करायचे असेल तर गांधी कुटुंबाने राजकारण सोडायला हवे. याचे कारण म्हणजे गांधींना काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन कसे करावे हे माहित नाही. ही पहिली गोष्ट आहे जी अगदी स्पष्ट आहे.मोदी आणि भाजपसाठी गांधी ही एक देणगी आहेत, असे सांगून रामचंद्र गुहा म्हणाले, जोपर्यंत गांधी कुटुंब कॉँग्रेसचे प्रमुख आहेत

ते मोदी आणि भाजपला केवळ मदत करत राहतील. काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदी गांधींना बसवणे मोदी आणि भाजपच्या हिताचे आहे. समीक्षक असे म्हणू शकतात की काही प्रकारचे मॅच-फिक्सिंग चालू आहे.
जोपर्यंत गांधींकडे कॉँग्रेसचे नेतृत्व आहे तोपर्यंत कॉँग्रेस मोदी सरकारच्या कोणत्याही चुकीवर टीका करता येणार नाही.

याचे कारण म्हणजे कॉँग्रेस विचारेल तेव्हा की चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे तर मोदी म्हणतील तुमचे आजोबा पंडीत नेहरू यांच्या पंतप्रधानांच्या काळात १९६२ पर्यंत काय झाले होते ते आठवा. देशातील माध्यमे, सामाजिक चळवळी यांच्यावर ते सवाल करतील तेव्हा भाजप म्हणेल की आणिबाणीचा काळ विसरलात का? तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनीच देशात आणिबाणी लागू केली होती.

ते भाजप सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतील तेव्हा भाजप म्हणेल तुमच्या वडीलांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच पराभव झाला होता. त्यामुळे जोपर्यंत या तीन पंतप्रधानांचे थेट वंशज काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत त्यांनो मोदी सरकारवर टीका करता येणार नाही.गुहा म्हणाले, गांधी कुटुंबाकडे नेतृत्व असेल तर भाजप २०२४ च्या निवडणुका निश्चित जिंकेल.

याचे कारण म्हणजे देशात १९१ जागांवर विरोधी पक्ष काँग्रेस आहे. त्यांना भाजप सहज हरवू शकतो. त्यामुळे गांधी कुटुंब राजकारणातून बाजुला झाले तरच कॉँग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपविरुध्द नाराजी होती. परंतु, कॉँग्रेसमध्ये विश्वासार्ह आणि प्रभावी नेतृत्व नव्हते.

त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दुसरे कारण म्हणजे सार्वत्रिक निवडणुका अधिकाधिक अध्यक्षीय होत आहेत. अद्यापही भारताच्या बऱ्याच भागांत कॉँग्रेसचा पराभव आहे. त्यामुळे एकदा काँग्रेसला विरोधी पक्षांमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान मिळाल्यावर राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येते.

त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांना होतो. त्यामुळे योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे कॉँग्रेसचे विसर्जन करणे गरजेचे नाही तर गांधी कुटुंबाचे जाणे महत्वाचे आहे. त्यासाठी काँग्रेसला नवे नेतृत्व शोधणे हा एकमेव व्यावहारिक पर्याय आहे. हे केवळ गांधीं कुटुंब स्वेच्छेने पक्षाबाहेर पडले तरच होऊ शकते.

याचे कारण म्हणजे त्यांचे पक्ष, पक्षाचे आर्थिक व्यवहार, संघटना आणि विचारसरणीवर नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांनाखरोखरच देशाची काळजी असेल, पक्षाची काळजी असेल तर त्यांनी लक्षात घ्यायला हवे की ते केवळ पक्षासाठीच नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी एक ओझे आणि अडथळा आहेत.

Do good not only to the Congress but also to the country, the Gandhi family should retire from politics, says Ramchandra Guha

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात