Hindutva – Gandhis – Ghuha : हिंदुत्वाशी लढायचे कसे…??; रामचंद्र गुहा आणि लिबरल्सची एकमेकांवरच आगपाखड…!!


उत्तर प्रदेशासह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली काय… एकीकडे काँग्रेसमध्ये हडकंप झाला… दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये निराशा पसरली… तिसरीकडे पोलस्टर्स काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी हायकमांडला त्यांनी न मागताच सल्ले द्यायला लागले… आणि चौथीकडे या हिंदुत्वाशी आता लढायचे कसे…?? यावर लिबरल जमात एकमेकांवरच आगपाखड करायला लागली आहे…!! Hindutva – Gandhis – Ghuha: How to fight Hindutva … ??; Ramchandra Guha and Liberals fire on each other … !!

– गांधीमुक्त काँग्रेस

पाचही राज्यांमधील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर लिबरल विचारवंतांनी वेगवेगळ्या वेब पोर्टल वर लेख लिहून काँग्रेस हायकमांडला गांधींपासून “मुक्त” होण्याचा सल्ला दिला आहे. असाच सल्ला महात्मा गांधींचे चरित्रकार आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसला दिला, पण त्यावर लिबरल लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून त्यांनी रामचंद्र गुहा यांच्या लेखावर जोरदार आगपाखड केली आहे.

– गांधींची प्रेरणा, नेहरूंचा लढा

महात्मा गांधींच्या प्रेरणेतून नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदुत्वाशी यशस्वी मुकाबला केला होता. पहिल्या 3 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याचा अनुभव आला होता. पण नंतरच्या गांधी कुटुंबाने हिंदुत्ववाद्यांना रान मोकळे करून दिले आणि 2014 – 2019 नंतर तर हिंदुत्ववाद्यांना गांधी कुटुंबियांनी मोकाटच सोडून दिले आहे, अशी शेरेबाजी रामचंद्र गुहा यांनी लेखात आणि ट्विटरवर केली आहे.

– लेखन बंदचा सल्ला

रामचंद्र गुहा यांच्या लेखावरून लिबरल जमात संतापली आहे. अमन वुहाद या एका सोशल मीडिया हँडलरने रामचंद्र गुहा यांना एक सवाल केला आहे… गांधी परिवार सोडून मला तुम्ही एक व्यक्ती अशी सांगा की जो हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात प्राणपणाने लढतो आहे…?? राहुल गांधी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर लढतात तेवढे कोणीच लढत नाहीत, असा दावा अमन वुहादने केला आहे. त्याही पलिकडे जाऊन त्याने रामचंद्र गुहांना लेखन बंद करण्याचा सल्ला दिला आहे…!!

– मुस्लिम “वोटिंग पॅटर्न”वर आगपाखड

तर हुसेन हैदरी याने मुस्लिमांच्या “वोटिंग पॅटर्न” बद्दल शंका व्यक्त करून मुसलमानांवर आगपाखड केली आहे. हे मुस्लिम फक्त भाजपला पराभूत करण्यासाठी बडबड करत राहतात पण प्रत्यक्षात मतदान करताना मात्र भाजपला मदत होईल, अशा स्वरूपाचा “वोटिंग पॅटर्न” राबवत मतदान करतात, अशा शब्दांमध्ये हुसेन हैदर यांनी आपला राग व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी बंगाल आणि उत्तर प्रदेशचे उदाहरण दिले आहे बंगालमध्ये भाजप विरोधात मुसलमान मोठ्याने बोलली पण भाजपच्या जागा तीन आमदारांनी वरून 77 आमदार अजून पोहोचले तसेच उत्तर प्रदेशात घडले मुसलमानांनी एक तर भाजपला मतदान केले किंवा भाजपला फायदा होईल अशा स्वरूपाचा “वोटिंग पॅटर्न” राबवला, असा दावा हुसेन हैदरीने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

– रामचंद्र गुहांचे उत्तर

हे सगळी ट्विट रामचंद्र गुहा यांनी रिट्विट केली असून पुन्हा एकदा आपल्या लेखाचे समर्थन करताना महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिंदुत्ववाद्यांची यशस्वीरित्या मुकाबला केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या नंतरच्या गांधी कुटुंबाने हिंदुत्ववाद्यांकडे देश सोपवून दिला. त्यांना ते कधीच विरोध करू शकले नाहीत, असा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुकांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपने जो प्रचंड विजय मिळवला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी टोपी धारण करून रोड शो केला. या पार्श्वभूमीवर आता या हिंदुत्ववाद्यांना हरवायचे कसे…?? या मुद्द्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे लिबरल जमातीतच जोरदार घमासान सुरू झाले आहे. हिंदुत्ववाद्यांची लढायचे कोणी, केव्हा आणि कसे…??, यावर या मुद्द्यावर ते एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. मात्र हिंदुत्ववाद्यांशी लढताना प्रामाणिक लिबरल भूमिका घेऊन संघटित स्वरूपाने मुकाबला केला पाहिजे, अशी सूचना एकानेही केल्याचे या आगपाखडीच्या गदारोळातून दिसून येत नाही…!!

Hindutva – Gandhis – Ghuha: How to fight Hindutva … ??; Ramchandra Guha and Liberals fire on each other … !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात