रशिया- युक्रेन युध्दाचा भारतीय तेल कंपन्यांना फायदा, रशियाकडून सवलतीत ३० लाख बॅरल तेल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना झाला आहे. तेल कंपनी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनने कच्च्या तेलाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत मोठ्या सवलतीत रशियाकडून 30 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. 20 ते 25 डॉलर प्रति बॅरलच्या सवलतीने ‘युरल्स क्रूड’ खरेदी केले आहे.Russia-Ukraine war benefits Indian oil companies, discounts 3 million barrels of oil from Russia

अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर रशियाने भारत आणि इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या किमतीत तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. आयओसीने स्वत:च्या अटींवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले आहे.



यामध्ये भारतीय किनारपट्टीवर विक्रेत्याकडून कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. मालवाहतूक आणि विमा व्यवस्थेतील निबंर्धांमुळे कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून ही अट घालण्यात आली होती.

कच्च्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे भागवणाऱ्या भारताला कच्च्या तेलाची स्वस्त दरात खरेदी करून आपले ऊर्जा बिल कमी करायचे आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, अपारंपरिक पुरवठादारांकडून इंधन खरेदी करण्यासाठी लागणारा विमा आणि मालवाहतूक खर्च यासारख्या बाबींचा विचार केल्यानंतरच सवलतीच्या किमतीत कच्च्या तेलाची विक्री करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाचे देश मूल्यांकन करेल.

विशेष म्हणजे भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी फक्त 1.3 टक्के रशियाकडून खरेदी करतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला १४१ देशांनी विरोध केला आहे. अमेरिका आणि पश्चिमी देशांनी अनेक कठोर निर्बंध रशियावर लादले आहेत.

सध्या अमेरिकेने भारताला हे देखील स्पष्ट केले आहे की जर ते रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत असेल तर ते अमेरिकेच्या निबंर्धांच्या नियमांचे उल्लंघन करत नाही. युक्रेन संकटामुळे अमेरिका, जपानसह अनेक देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.

Russia-Ukraine war benefits Indian oil companies, discounts 3 million barrels of oil from Russia

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात