पुण्यात होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई

राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने होळी आणि धुलीवंदन सार्वजनिकरित्या साजरी करण्यास बंदी घातली आहे.Ban on public celebration of Holi, Dhulivndan in Pune


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने होळी आणि धुलीवंदन सार्वजनिकरित्या साजरी करण्यास बंदी घातली आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा,

सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे 28 मार्च रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच 29 मार्च रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हयातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे आवश्यक ती मानद कार्यप्रणालीनुसार

पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Ban on public celebration of Holi, Dhulivndan in Pune

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*