पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे.ALIBAG: Raigad police force also hit by corona, infecting 60 people
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातली त्यात महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण जास्तच चालले आहे.रायगड पोलीस दलातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकारी आणि ५४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.एवढया मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोल दुधे यांचाही समावेश आहे.या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे. तसेच विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App