Corona has delayed four municipal elections in West Bengal, now with restrictions in the state till January 31

कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका लांबल्या, आता राज्यात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध

municipal elections in West Bengal : राज्यातील कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने चार नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने शनिवारी सांगितले की, कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता चार नगरपालिकांच्या निवडणुका आता तीन आठवड्यांनी पुढे ढकलून 12 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय झाला आहे. Corona has delayed four municipal elections in West Bengal, now with restrictions in the state till January 31


वृत्तसंस्था

कोलकाता : राज्यातील कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने चार नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने शनिवारी सांगितले की, कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता चार नगरपालिकांच्या निवडणुका आता तीन आठवड्यांनी पुढे ढकलून 12 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय झाला आहे.

यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सिलीगुडी नगरपालिका, चंदेरनागौर नगरपालिका, विधाननगर नगरपालिका आणि आसनसोल नगरपालिकांच्या निवडणुका आता २२ जानेवारीऐवजी १२ फेब्रुवारीला होणार आहेत. मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचेही निवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश

तत्पूर्वी, शनिवारीच राज्य सरकारने आयोगाला पत्र लिहून कोरोना महामारीच्या सद्य:स्थितीमुळे निवडणुकीची तारीख बदलण्यास आपल्या वतीने सहमती दर्शवली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने आयोगाला कोरोनाची परिस्थिती पाहता नागरी निवडणुका चार ते सहा आठवडे पुढे ढकलण्याची शक्यता तपासण्यास सांगितले होते.

बंगालमध्ये 31 जानेवारीपर्यंत निर्बंध

दुसरीकडे, राज्य सरकारने कोविड-19 निर्बंध 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात सुरक्षेच्या निकषांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने मोकळ्या मैदानात जत्रा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे म्हटले आहे. याशिवाय, जास्तीत जास्त 200 लोकांना किंवा स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना लग्न समारंभांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी, प्रोटोकॉलचे पालन करून, अतिशय संयमित पद्धतीने मोकळ्या ठिकाणी जत्रांना परवानगी दिली जाऊ शकते, असेही आदेशात नमूद आहे.

Corona has delayed four municipal elections in West Bengal, now with restrictions in the state till January 31

महत्त्वाच्या बातम्या