UP BJP candidate list : भाजपच्या पहिल्या यादीत ४४ ओबीसी, १९ एससी, १० महिला; २० हून अधिक आमदारांची कापली तिकिटे, वाचा सविस्तर..

UP BJP candidate list: In the first list of BJP, 44 OBCs, 19 SCs, 10 women, cut tickets of more than 20 MLAs, read more

UP BJP candidate list : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने नोएडाचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना तिकीट दिले आहे. तर नंदकिशोर गुर्जर यांना लोणीतून तिकीट देण्यात आले आहे. UP BJP candidate list: In the first list of BJP, 44 OBCs, 19 SCs, 10 women, cut tickets of more than 20 MLAs, read more


वृत्तसंस्था

लखनऊ : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने नोएडाचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना तिकीट दिले आहे. तर नंदकिशोर गुर्जर यांना लोणीतून तिकीट देण्यात आले आहे.

गौतम बुद्ध नगरच्या तीनही जागांवर भाजपकडून केवळ विद्यमान आमदारालाच तिकीट मिळाले आहे. नोएडा विधानसभेचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरी विधानसभेतून तेजपाल नगरला भाजपचा उमेदवार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेवर विधानसभेचे विद्यमान आमदार धीरेंद्र सिंह यांना तिकीट मिळाले आहे. बेबीराणी मौर्या आग्रा ग्रामीणमधून निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी त्या उत्तराखंडच्या राज्यपाल होत्या. 107 जागांपैकी 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत 21 नवीन चेहरे आहेत.

यांची कापली तिकिटे

अमरोहा – आमदार संगीता चौहान
मेरठचे सिवालखास – जितेंद्र सटवाई
मेरठ कॅंट – सत्यप्रकाश अग्रवाल
खेरगड – महेश गोयल
एतमादपूर- राम प्रताप सिंग
आग्रा ग्रामीण – हेमलता दिवाकर
फतेहपूर सिक्री – चौधरी उदय भान सिंग
फतेहाबाद – जितेंद्र वर्मा
बेहत – नरेश सैनी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे
नुक्कड – डॉ.धनसिंह सैनी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे
अलीगड बरौली – ठाकूर दल वीर सिंग
बरेली – बिथरी चैनपूर – राजेश कुमार
बरेली कँट – राजेश अग्रवाल
गोरखपूर – डॉ. राधादास मोहन अग्रवाल
सिकंदराबाद – लक्ष्मी राज सिंह

भाजपच्या पहिल्या यादीत 10 महिला उमेदवार

भाजपने 10 महिलांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये 2 ठाकूर, 1 ब्राह्मण, 3 ओबीसी, (जाट-2 आणि माळी 1) आणि 4 अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत.

UP BJP candidate list : In the first list of BJP, 44 OBCs, 19 SCs, 10 women, cut tickets of more than 20 MLAs, read more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात