ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.
पवारांच्या नातवंडांची धडपड
शरद पवारांचे तीन नातू रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचे राजकारणात बस्तान बसावे, यासाठी धडपड करताना पवार कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारावे लागले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांची संघर्ष करावा लागला, पण तो संघर्ष यशस्वी झाल्याचे दिसले नाही कारण राष्ट्रवादीतले political friction सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले. सुनेत्रा पवारांना आम्ही ज्येष्ठांना बाजूला सारले नाही, असे सांगावे लागले. या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा शरद पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागल्या. यातून पवार कुटुंब स्वतःच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा किंमत ठेवत नाही, हेच राजकीय चित्र सगळ्या महाराष्ट्राला दिसले.
भाजप – शिवसेनेतल्या राजकीय हालचाली
मात्र पवारांच्या नातवंडांची अशी धडपड सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये युवा नेत्यांची वेगळी राजकीय हालचाल महाराष्ट्र समोर आली. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी घराणेशाहीतल्याच युवा नेत्यांना राजकारणात पुढे आणले, पण त्यांना पुढे आणताना आपापल्या पक्षांमधल्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले नाही. दोन्ही पक्षांमध्ये युवकांना लोकांमध्ये जाऊन संघटन करा, असा संदेश देऊन पाठविले गेले.
कृष्णराज महाडिकची युवा सन्मान यात्रा
भाजपने दोन-तीन आठवड्यांपूर्वीच युवा भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक याला युवा सन्मान यात्रा काढायला लावली. कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत छोट्या मोठ्या शहरांमधून ही यात्रा गेली. यानिमित्ताने कोल्हापूरच्या मातब्बर महाडिक घराण्यातल्या कृष्णराज याचे नेतृत्व भाजपमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. पण तो प्रयत्न करताना भाजपने ज्येष्ठ नेत्यांना डावलले नाही. कृष्णराज महाडिक याला लोकांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन करायला लावले. त्यामुळे कृष्णराज महाडिक याची नवी प्रतिमा तयार करण्यात भाजपला यश आले.
श्रीकांत शिंदे यांच्या बैठका
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर शिवसेनेची जबाबदारी देऊन त्यांना 100 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन शिवसैनिकांचे मेळावे घ्यायला लावले. आपल्यानंतर श्रीकांतच शिवसेनेची सगळी धुरा खांद्यावर पेलेल हा संदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला. पण तो संदेश देताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलले नाही. त्यांना बाजूला सारले नाही. उलट उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर शिवसैनिकांच्या मेळाव्यात जायला सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक पासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यांनी नाशिकमध्ये विधानसभा निहाय बैठका घेतल्या त्यात शिवसैनिकांना निवडणुका संदर्भात आणि मतदारयाद्यांच्या SIR मधल्या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. शिवसेनेचे जाळे अधिक मजबूत केले.
पवारांच्या नातवंडांचे पक्षासाठी दौरेच नाहीत
त्या उलट रोहित पवारांनी दररोज पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या अपघाताविषयी तो घातपात असल्याचा विषय चिघळत ठेवला. पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांबरोबर पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे दौरे केले. जय पवारांनी बारामतीपुरताच जनता दरबार घेतला. पण पवारांच्या नातवंडांपैकी कुणीही राज्यव्यापी दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत केले नाही किंवा ते कार्यकर्त्यांमध्ये जाऊन मिसळल्याचे दिसले नाही. त्यांनी फक्त माध्यमांमध्ये राहण्याची चमकोगिरी केल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App