नाशिक : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.Parth Pawar’s statement immediately after the news regarding Prashant Kishor; but silent on the political turmoil in the NCP!!
– प्रशांत किशोर संदर्भात बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीतीकार बदलला. डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्या ऐवजी प्रशांत किशोर यांना नवा रणनीतीकार म्हणून नेमले, अशा आशयाच्या बातम्या आज मराठी माध्यमांनी दिल्या. त्याबरोबर राष्ट्रवादी संदर्भात वेगवेगळ्या अटकळी सुरू झाल्या. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती रणनीती निश्चित करणार??, त्यात कुठले बदल सुचविणार??, त्यातून राष्ट्रवादी कशी झेप घेणार??, अशा आशयाचे विश्लेषण सुरू झाले.
Prashant ji is a friend and like a brother. He is known to us since Dada’s time. Yesterday he was in town so we had pleasure to have him at home for lunch and some insightful conversation. Regarding some speculation about him working with NCP, let me set the record straight. To… — Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) May 19, 2026
Prashant ji is a friend and like a brother. He is known to us since Dada’s time. Yesterday he was in town so we had pleasure to have him at home for lunch and some insightful conversation.
Regarding some speculation about him working with NCP, let me set the record straight. To…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) May 19, 2026
– पार्थ पवारांचा खुलासा
या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी आपल्या ट्विटर हँडल वर लगेच खुलासा करून टाकला. प्रशांत किशोर आपले मित्र आहेत ते काल मुंबईला आले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी एकत्र जेवण घेतले. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, पण प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणे केव्हाच थांबविले आहे. ते त्यांच्या निर्णयात बदल करण्याची शक्यता नाही. पण आम्ही दोघे मित्र असल्यामुळे आम्ही एकमेकांसाठी गरज पडेल तसे निश्चितच उपलब्ध असू, असे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.
– political promptness
या सगळ्यातून पार्थ पवार यांची political promptness म्हणजे राजकीय तत्परता समोर आली. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस साठी काम करणार अशी बातमी आल्याबरोबर त्यांच्याविषयी माध्यमांमध्ये कुठला गैरसमज होऊ नये, यासाठी स्वतः पार्थ पवारांनी पुढाकार घेऊन केले. त्यांनी आपल्या मित्राच्या प्रतिमेची काळजी घेतली.
– राष्ट्रवादीतले मतभेद
पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खुद्द पार्थ पवार यांच्याच मुळे मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. त्याबद्दल कुठलाही खुलासा करायची तसदी पार्थ पवार यांनी घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार विरुद्ध ज्येष्ठ नेते असा संघर्ष रंगल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी गेल्या आठवडाभरात दिल्या. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पार्थ पवार यांनी विक्रम काकडेच्या नावाचा आग्रह धरला, पण तो प्रफुल्ल पटेल यांनी खोडून काढला. त्यामुळे पार्थ पवार हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात गेले. सुनेत्रा पवारांनी पार्थ पवार आणि जय पवार यांचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना दूर सारण्याचा “डाव” खेळला. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी तिजोरी ताब्यात घेतली, अशा आशयाच्या बातम्यांनी मराठी माध्यमांचे रकाने भरले.
– ज्येष्ठ नेत्यांबाबत political promptness नाही
पण पार्थ पवारांनी या बातम्या संदर्भात कुठलाही खुलासा केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात येत नसल्याचे त्यांनी पुढे येऊन सांगितले नाही. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसंदर्भात त्यांना कुठलाही खुलासा करावासा वाटला नाही. राष्ट्रवादीची तिजोरी कुण्याच्या ताब्यात आहे??, याविषयी त्यांना काही सांगावेसे वाटले नाही. त्यांच्या ट्विटर हँडलवर तशी कुठलीच गोष्ट दिसली नाही. पण फक्त प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीचे रणनीती सोपविल्याची बातमी आल्याबरोबर पार्थ पवारांनी political promptness म्हणजेच राजकीय तत्परता दाखवून आपल्या ट्विटर हँडल वरून खुलासा करून टाकला. पार्थ पवारांच्या राजकीय वर्तणुकीतली ही विसंगती बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकून गेली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App