विशेष प्रतिनिधी
पंढरपूर: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीने दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 8 ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी कार्तिकी यात्रा दि. 10 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होत असून, भाविकांच्या सोयीसाठी दि. 14 नोव्हेंबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासह मंदिर समितीची २०२७ साठी दिनदर्शिका व दैनंदिनी छपाई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पंढरपूर येथील पर्यटक निवासासाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मंदिर समितीच्या जमिनी व मालमत्तेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी शासन सेवेतून सेवानिवृत्त व अनुभवी नायब तहसीलदार यांची मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय देखील या सभेत घेण्यात आला.
दरम्यान, गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘यावर्षी राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणी माता हे शेतकऱ्यांचे दैवत असून शेतकरी आणि कष्टकरी हे विठुरायाचे भक्त आहेत. अनेक भक्तांनी यापूर्वी मंदिर समितीला मोठी मदत केली आहे. आज त्याच भक्तांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App