महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; शिंदे – फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Free treatment in all government hospitals in Maharashtra

राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ आरोग्य संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. अशा प्रकारे मोफत उपचार मिळावेत यासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार देण्यात आला आहे.

कुठे मिळणार मोफत उपचार?

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये (Super Speciality Hospital : नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणीही मोफत उपचार मिळणार आहेत. येथे केस पेपर काढण्यासाठी शेकडो लोकांना रांगेत उभे राहावे लागते त्यासाठी शुल्क मोजावे लागते या शुल्कातून साधारणपणे 71 कोटी रुपये वर्षाला राज्य सरकारला मिळतात पण आता मात्र सर्वांना येथे मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात २.५५ कोटी नागरिक उपचारांसाठी येतात.

मात्र नगरपालिका, महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

Free treatment in all government hospitals in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात