विशेष प्रतिनिधी
पुणे : इंटरनेटवर सध्या विक्रम गोखले आणि कंगना राणावत ही नवं अगदी ट्रेंडिंग आहेत. कारण कंगणाने केलेलं विधान होय. कंगना म्हणाली होती की, आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळालेले आहे. या विधानाला विक्रम गोखले यांनी सहमती दर्शविली हाेती. त्यानंतर अवधूत गुप्तेने देखील विक्रम गोखले यांच्या मताला सहमती दर्शवली होती. मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच लोकांनी त्यांच्या या विधानांना पाठिंबा दिला तर बऱ्याच लोकांनी विरोध केला.
Famous for his outspokenness, Yogesh Soman refrained from commenting on Vikram Gokhale’s statement
स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते योगेश सोमण यांना यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी मात्र मौन बाळगण्याचे ठरवले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया विक्रम गोखले यांच्या या मताबद्दल दिलेली नाहीये.
Vikram Gokhale: ‘तो’ विश्वासघातच होता ! भाजप शिवसेनाने पुन्हा एकत्र यावं ; सुडो सेक्युलारिझम सांभाळणार्या लोकांना याचीच भीती
टिळक रोड येथील मराठी साहित्य परिषदेच्या सभागृहात एक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात योगेश सोमण यांना विक्रम गोखलें विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, परखडपणे आणि स्पष्टपणे व्यक्त होता आलं पाहिजे. आपले विचार आग्रहाने मांडता आले पाहिजेत. पण आज मी येथे विक्रम गोखलेवर बोलणार नाही. असे योगेश सोमण म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ऊरी या चित्रपटामध्ये योगेश सोमण यांनी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिका साकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App