Vikram Gokhale: ‘तो’ विश्वासघातच होता ! भाजप शिवसेनाने पुन्हा एकत्र यावं ; सुडो सेक्युलारिझम सांभाळणार्‍या लोकांना याचीच भीती


शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावं असं मत पुन्हा एकदा विक्रम गोखलेंनी व्यक्त केलं आहे. 

वृत्तसंस्था

मुंबई: भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. असं रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. या दोन पक्षांच ध्येय एकच आहे.BJP and Shiv Sena should come together again

पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेना एकत्र यावं असं विक्रम गोखले म्हणाले होते. याचबाबत आज मुंबईच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

वाचा सविस्तर

 • आपला देश हा फार विचित्र अशा कड्यावर उभा आहे. त्यामुळे तिथून मागे यायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे.
 • भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे. त्याची गरज आहे.
 • सुडो सेक्युलारिझम सांभाळणारे जे लोकं आहेत त्यांना मात्र याची भीती वाटतेय.
 • दीड एक वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाऊ-भाऊ, धाकटा भाऊ, मोठा भाऊ हे सगळं जे बोलणं झालं..
 • सामान्य मतदारांनी विश्वास ठेवला त्यांना निवडून दिलं. मतदान केलं कारण ते दोन्ही पक्ष एकाच कल्पनेने एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते.’
 • ‘दोन्ही पक्षातील खूपच मोठमोठी माणसं.. ज्यांची तुलनाच होऊ शकत नाही इतरांशी त्याविषयावर अशी खूप मोठी माणसं दोन्ही पक्षात होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकलेला माणूस आहे मी. त्यांची वृत्तपत्र वाचलेला माणूस आहे मी. त्यांचा जो अजेंडा आहे तो काय हे समजावून घेतल्यानंतर त्या पक्षाशी त्याच्या जवळ न जात लांब राहून पण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी त्याला पाठिंबा देत आलेलो आहे.
 • एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात त्याच्यावर मी विश्वास ठेवला.
 • माझ्यासारख्या करोडो लोकांनी विश्वास ठेवला. त्यांना निवडून दिलं मी.
 • निवडणूक झाली. त्यानंतर जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं, इतकं धक्कादायक होतं. जनतेला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं आणि हा विश्वासघात नाही तर काय?
 • ‘दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. दोन्हीही पक्ष माझे मित्र आहेत. पण दोघांच्या चुका झालेल्या आहेत. दोन्ही पक्षातील जे जबाबदार लोक आहेत त्यांच्याशी मी स्वत: बोललोय. म्हणून मी असं म्हणतो की, अजूनही वेळ गेलेली नाही.
 • फार विचित्र अशा कड्यावर आपला देश उभा आहे. अशी माझी खात्री आहे. माझ्या अभ्यासामुळे. शंका नाहीए मला त्यावर.
 • ‘एक लक्षात ठेवा १९६२ सालचा भारत आज २०२१ मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा आज जगाला कळतं आणि आपल्या शत्रूंनाही कळतं तेव्हा ते थांबतात.
 • ५० वेळा विचार करतात की, आम्ही हिंदुस्थानच्या विरोधात सैन्याची जमवाजमव करतोय. काय करता येईल.
 • तर या असल्या शत्रूंना खतपाणी पुरवणारे जे आपल्या देशातील राजकीय पक्षांचे काही नेते हे त्यांच्याशी संबंधित असतात तेव्हा माझा संताप होतो आणि तो मी लपवत नाही. लपवणार नाही.
 • म्हणूनच मी असं म्हणालो की, अजूनही वेळ गेलेली नाही. मी परत-परत हे म्हणत राहिल की, भाजप शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे किंवा समविचारी जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. ही माझी प्रमाणिक इच्छा आहे.

BJP and Shiv Sena should come together again

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण