हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.There is no need to change religion to teach Hinduism; But don’t let your people change their religion, Sarsanghchalak’s appeal

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मदकू बेटावर आयोजित ३ दिवसीय घोष शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. भागवत म्हणाले, कलयुगात भारताला विश्व गुरू करण्यासाठी एकत्र येऊन वाटचाल करण्यासाठी संघटना महत्वाची आहे. भारतीय समाजात खूप विविधता आहे. येथे अनेक देवी-देवता आहेत.



असं असलं तरी प्रत्येकाला सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. हीच प्रक्रिया मागील अनेक शतकांपासून सुरू आहे. हिंदू धमार्ची शिकवण कुणाचंही धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न न करता जगाला देण्याची गरज आहे. भारतातील हिंदू धर्म सत्य आहे आणि आपल्या देशाने हा सत्याचा मार्ग जगाला दाखवला पाहिजे.

कलयुगात जे कमकुवत आहेत केवळ त्यांचंच शोषण होते असे सांगून सरसंघचालक म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी देखील कमकुवतपणा हा शाप असल्याचे म्हटले आहे. शक्ती म्हणजे संघटीतपणे जगणे आहे. एकटा व्यक्ती कधीच शक्तीशाली असू शकत नाही. कलयुगात संघटन हीच शक्ती आहे. आपल्याला प्रत्येकाला एकत्रित आणले पाहिजे. त्यासाठी त्यांना बदलवण्याची गरज नाही.

There is no need to change religion to teach Hinduism; But don’t let your people change their religion, Sarsanghchalak’s appeal

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात