धार्मिक आधारावरची फाळणी हिंदू राष्ट्रवादाने नाकारली; आज देश सावरकरांच्याच विचारांवर चालतोय; सरसंघचालकांचे प्रतिपादन


प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपल्या पूजा पद्धतीच्या आणि धर्माच्या आधारावर ज्यावेळी लोकांनी स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करून देश मागण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हिंदू राष्ट्रवादाने धार्मिक आधारावर लोकांमध्ये भेदभाव करण्याचे नाकारले. हिंदू राष्ट्रवादाने धार्मिक आधारावरची फाळणी नाकारली. हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार होता, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. केंद्रीय सूचना संचालक उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या सावरकरांवरच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. Hindu nationalism rejects religious divisions; Today, the country is following Savarkar’s thoughts; Sarsanghchalak’s statement

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकरांची बदनामी करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर चालवली गेली. ते सुमार बुद्धीचे लोक आहेत. परंतु आज जर देश सावरकरांच्या विचारांवर चालला आहे असे कोणी म्हणत असेल तर ते योग्यच आहे. कारण सावरकरांनी देशाला मजबूत संरक्षण नीती आणि परराष्ट्र नीती दिली. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांमध्ये सावरकरांचे विचार आजही प्रासंगिक वाटतात. याचा अर्थच ते काळाच्या कसोटीवर उतरले आहेत. 2014 पर्यंत देशाचे संरक्षण धोरण हे परराष्ट्र धोरणाच्या पाठीमागे चालले होते. आपल्यावर आक्रमणे झाली तरी लोक काय म्हणतील म्हणून आपण गप्प बसत होतो. 2014 नंतर आपले परराष्ट्र धोरण हे संरक्षण धोरणाच्या पाठीमागे चाललेले आहे. आपले संरक्षण धोरण मजबूत करण्यामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मूलभूत विचार आहे, असे डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.



स्वातंत्र्यापूर्वीच्या महापुरुषांमध्ये प्रामाणिक मतभेद होते. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एक होते असे म्हणायचे कारण नाही. त्यांच्यात मतभेद होते. परंतु त्यांना एकमेकांविषयी आदर होता, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.

स्वामी विवेकानंद, महर्षि दयानंद सरस्वती, सावरकर या प्रत्येकाचे हिंदुत्व वेगळे असल्याची मांडणी करण्याची फॅशन देशात रूढ होत आहे. वास्तविक त्यांच्या हिंदुत्वमध्ये काहीही फरक नाही. ज्यावेळी काही लोकांनी धार्मिक आधारावर स्वतंत्र देश मागितला, त्यावेळी मोठ्या आवाजात हिंदू राष्ट्रवादाचा पुकारा करण्याची गरज होती. ती सावरकरांनी केली पूर्ण केली. त्यावेळी जर संपूर्ण हिंदू समाजाने सावरकरांच्या आवाजात आवाज मिसळून हिंदू राष्ट्रवादाचा पुकारा केला असता, तर आज ज्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत त्या भेडसावल्या नसत्या, असे प्रतिपादन देखील सरसंघचालकांनी केले.

सावरकर हे हिंदुत्वाच्या लढ्याचे सेनापती होते म्हणून त्यांनी तडजोडीची भाषा केली नाही. त्यांचा हिंदू राष्ट्रवाद मानवतावादाशि अजिबात विसंगत नाही, असेही त्यांनी सांगितले.

सावरकरांच्या बदनामीमागे या देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्याचा डाव आहे. आज सावरकरांची बदनामी काही लोक करतात. उद्या हेच लोक स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद सरस्वती यांची ही बदनामी करायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा डॉक्टर भागवत यांनी दिला. कारण त्यांचा इरादा व्यक्तीची बदनामी करण्यापेक्षा देशाच्या मूलभूत विचाराची बदनामी करण्याकडे आणि द्वेष करण्याकडे अधिक आहे हे लक्षात घेतले पाहिजे, याकडे डॉ. मोहन भागवत यांनी लक्ष वेधले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लेखक उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. रूपा पब्लिकेशन ए हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Hindu nationalism rejects religious divisions; Today, the country is following Savarkar’s thoughts; Sarsanghchalak’s statement

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात