विशेष प्रतिनिधी
रायपूर : गरीबीचा फायदा घेऊन आदिवासींच्या होणाऱ्या धर्मांतराविरुध्द छत्तीसगडच्या राजघराण्यातील प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन घरवापसी मोहीमेत ४०० कुटुंबातील १२०० लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले.Operation Gharvapsi Against Tribal Conversion, 1200 people from Chhattisgarh converted back to Hinduism
छत्तीसगडमधील पत्थलगावच्या खुंटापानी येथे ४०० कुटुंबांच्या गरीबीचाफायदा घेऊन तीन पिढ्यांपूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचे धर्मांतरण केले होते. मात्र, या सर्वांनी त्यांच्या मूळ हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. या दोन दिवसीय घरवापसी सोहळ्याला हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. प्रबल प्रताप सिंह जुदेव आपरेशन घरवापसीचे प्रमुख आहे.
त्यांनी सर्वांचे पाय धुवून हिंदू धर्मात परतलेल्यांचे स्वागत केले.प्रबल प्रताप सिंह जुदेव हे जशपूर राजघराण्यातील आहेत. त्यांचे वडील छत्तीसगडचे माजी खासदार असलेले दिलीप सिंह जूदेव यांनी आयुष्यभर हिंदू धर्मासाठी काम केले. हजारो आदिवासींना पुन्हा हिंदू धर्मात आणले. त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. ते जेथे जात तेथे तरुण स्वत:च्या रक्ताने त्यांचा अभिषेक करत.
प्रबल प्रताप हे त्यांचे पुत्र असून अमेरिकेतील सुखासिन आयुष्य सोडून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. हिंदुत्वाचे रक्षण करणे हाच आपल्या आयुष्यातील एकमेव संकल्प असल्याचे ते सांगतात.
प्रबल प्रताप सिंह जुदेव प् म्हणाले, आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्या मूळ धर्मात परतणे हे खूपच चांगले संकेत आहेत. कुणाच्या असहायतेचा, गरिबीचा फायदा घेऊन केलेले काम कधीच टिकणारे नसते. मिशनऱ्यांनी गरीब आदिवासी, वनवासींच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतर केले. शिक्षण आणि आरोग्याच्या नावाखाली त्यांनी धमार्चा उघडउघड व्यापार केला, पण आम्ही हे कारस्थान उघड करीत राहू.
यावेळी हिंदू धर्मात परतलेल्या कुटुंबांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज सुमारे तीन पिढ्यांपूर्वी धर्मांतरित झाले होते. त्यावेळी ते खूप गरीब होते आणि मिशनºयांकडून शेतीसाठी आर्थिक मदत आणि रोगांवर उपचार केल्यामुळे आमच्या पूर्वजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, पण आता आम्हाला स्वत्वाची जाणीव झाली आहे आमचा स्वाभिमान जागृत झाला आहे.
त्यामुळेच आम्ही पुन्हा स्वधर्मात परतण्याचा निर्णय घेतला, असे या कुटुंबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.या संपूर्ण घरवापसी मोहिमेत १०० कुटुंबे स्थानिक तर उर्वरित ३०० कुटुंबे बसना सरायपाली येथील होती. या सर्वांना २० बसगाड्यांमधून आणण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App