कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी


वृत्तसंस्था

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि एनआरसी मागे घेण्याची मागणी पुढे आली आहे. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे प्रमुख मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली आहे.Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi

जनतेची शक्ती मोठी असते. शेतकऱ्यांनी दीड वर्षे आंदोलन केले. त्यांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले. त्यामुळे त्यांनी कृषी कायदे मागे घेतले. सिटिझन अमेंडमेंट अॅक्ट अर्थात भारतीय नागरिकत्व कायदा सुधारणा कायदा आणि नॅशनल रजिस्ट्रेशन एनआरसी हे कायदे देखील मागे घ्यावेत. कारण त्यामुळे मुसलमान समाज दुखावला जातो, अशी मागणी मौलाना अर्षद मदानी यांनी केली आहे.



आता या मागणीवरून देखील देशात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुकांवर हे राजकारण प्रभाव टाकेल. मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली असली तरी आता कोणत्या संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच विरोध करण्यासाठी पुढे येणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात