आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”Even if suspension of workers does not solve the problem ….”; Atul Bhatkhalkar aims at Thackeray government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बऱ्याच दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान राज्य सरकारने जो कर्मचारी कामावर हजर होणार नाही अशा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.तसेच कामावर रूजू न झाल्यास यापुढेही निलंबन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, आज राज्यातील एकूण २९७ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.याच कारणावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
भातखळकर म्हणाले आहेत की,’संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.’ तसेच कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल, असेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल. pic.twitter.com/xwoiMSpQyo — Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) November 20, 2021
संपात सहभागी झालेले २९७ कर्मचारी एसटी महामंडळाकडून निलंबित; २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर आधी परिवहन मंत्र्यांना आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निलंबित करून बघायला काय हरकत आहे. कदाचित पटकन प्रश्न सुटेल. pic.twitter.com/xwoiMSpQyo
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) November 20, 2021
“Even if suspension of workers does not solve the problem ….”; Atul Bhatkhalkar aims at Thackeray government
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App