महाराष्ट्रा पाठोपाठ केरळमध्येही एसटी कर्मचाऱ्यांचा संप; सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार मधले परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देण्याचा इशारा दिला आहे. काही कर्मचाऱ्यांना अशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत.Following Maharashtra, ST workers also went on strike in Kerala

ऐन दिवाळीच्या काळात एसटीच्या चार कर्मचाऱ्यांनी तुटपुंज्या पगारामुळे आणि सेवा समाप्तीच्या नोटीस या कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. अनिल परब हे दिवाळीनंतर एसटी कर्मचाऱ्यांशी वाटाघाटी करण्यासाठी आग्रही आहेत, तर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली आहे.

महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे संपाचे लोण मात्र आता केरळ पर्यंत पोहोचले आहे. केरळ मध्ये आज दिवसभर सुमारे 30 हजार एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला. केरळ राज्यात पाच हजार एसटी गाड्या आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या डेपोत लावल्याची आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर दिवाळीच्या वेळेत प्रतिकूल परिणाम झाला आहे.

काँग्रेसशी संलग्न असणाऱ्या आणि डाव्या पक्षांशी संलग्न असणाऱ्या आयटक तसेच इंटक कामगार संघटना केरळच्या एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्या आहेत.

महाराष्ट्रात मात्र इंटक संघटनेने याबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. केरळ मधल्या एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही मागणी मान्य केली तर परिवहन खात्यावर तीस कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, अशी माहिती केरळचे परिवहन मंत्री सुरेश थॉमस यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वाटाघाटी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Following Maharashtra, ST workers also went on strike in Kerala

महत्त्वाच्या बातम्या