युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट


वृत्तसंस्था

हंगेरी : कोरोना संपला असतानाच युरोपात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. ऑस्ट्रिया सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला आहे. जर्मनीत परिस्थिती बिघडली आहे. चौथ्या लाटेमुळे युरोपमध्ये प्रवाशांना फटका बसला त्यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. Locked down again in Austria, the situation worsened in Germany; corona fourth wave hit to Europe

चौथ्या लाटेमुळे लॉकडाऊन लावणारा हा युरोपातील ऑस्ट्रिया हा पहिला देश ठरला आहे. जर्मनीतील परिस्थितीही विकोपाला गेलीआहे. तेथेही लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. जर्मनीच्या मावळत्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी या बाबीला पुष्टी दिली.

नेदरलँडमध्ये २३ हजार नवे रुग्ण सापडले. डिसेंबर २००० मध्ये नेदरलँडमधील रुग्णसंख्या १३ हजार होती. तेथे अंशत: लॉकडाऊन लावला आहे. पूर्व युरोपातील अनेक देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.



सूत्रांनी सांगितले की, नाताळाच्या सुट्यातील नियोजित प्रवासास कोरोनाचा फटका बसणार आहे. एकट्या ब्रिटनमधून २,५०,००० लोक नाताळमध्ये दोन ते तीन देशात प्रवास करतात. त्यांना प्रवासाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. लाट लांबल्यास प्रवास रद्दच होतील. नाताळच्या प्रमुख बाजार असलेल्या म्युनिक येथील सगळे नियोजन यंदाही रद्द झाले आहे. यंदाचा स्की हंगामही धोक्यात आला आहे.

पूर्व युरोपात लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी असले आहे. मात्र, ऑस्ट्रिया जर्मनी आणि नेदरलँड येथील ६४ ते ७३ टक्के नागरिकांचे पूर्णत: लसीकरण झालेले आहे. ब्रिटनमधील लसीकरणाचे प्रमाण ६८ टक्के आहे.

Locked down again in Austria, the situation worsened in Germany; corona fourth wave hit to Europe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात