राहुल गांधींच्या श्वानाच्या पिल्लाचं नाव ‘नूरी’ ठेवल्याने संतापाची लाट, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत AIMIM कोर्टात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच त्यांची आई सोनिया गांधी यांना श्वानाचे पिल्लू भेट दिले आहे. या पिल्लाचे नाव नूरी असे होते. या पिल्लाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे राज्य प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.AIMIM sues court for naming Rahul Gandhi’s puppy ‘Noori’, alleging it hurt religious sentiments

नावावरून का होतोय गदारोळ?

श्वानाच्या पिल्लाचे नूरी असे नाव ठेऊन तक्रारदाराच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे वकिलाने म्हटले आहे. ते म्हणतात की नूरी हा शब्द विशेषत: मुस्लिम धर्माशी संबंधित आहे आणि इस्लाम धर्मात तो प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित आहे. वकिलाने सांगितले की, कुराण मजीद सुरा नूर आयत 35 मध्येही ‘नूरी’ शब्दाचा उल्लेख आहे. मुस्लिम मुलींची नावेही ‘नूरी’ असल्याचे त्यांनी सांगितले. फरहान सांगतात की, त्यांनी राहुल यांना नाव बदलून माफी मागायला सांगितली, पण त्यांनी तसे केले नाही.



वकिलाचे म्हणणे आहे की, असे करून राहुल गांधींनी आमच्या मुलींचा, वाडवडिलांचा आणि विशेषत: आमच्या पैगंबरांचा अपमान केला आहे. इस्लामच्या आगमनापासून कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने या प्राण्याचे नाव ‘नूरी’ ठेवलेले नाही. एआयएमआयएम नेत्याच्या वकिलाने सांगितले की, कोर्टाने फरहान यांना 8 नोव्हेंबरला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावले आहे. ते म्हणाले की, तक्रारीचा विचार केल्यानंतर न्यायालय राहुल गांधींना समन्स बजावू शकते.

काय आहे प्रकरण?

वास्तविक, राहुल गांधी यांनी नुकतेच त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जेव्हा ते त्यांच्या गोव्याच्या दौऱ्यावर होते, तेव्हा तेथील एका कुटुंबाने त्यांना श्वानाचे एक पिल्लू दिले होते. त्यांनी हे पिल्लू दिल्लीला आणले आणि नंतर हे पिल्लू त्यांच्या आईला भेट दिले. व्हिडीओमध्ये ते असे म्हणताना ऐकू येतात की, मला तुमची (सोनिया गांधी) माझ्या कुटुंबातील नवीन सदस्याशी ओळख करून द्यायची आहे, ज्याचे नाव नूरी आहे. हे पिल्लू ते त्यांच्या आईला देतात.

AIMIM sues court for naming Rahul Gandhi’s puppy ‘Noori’, alleging it hurt religious sentiments

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात