उत्तराखंडमधील बेकायदा मदरशांविरोधात मुख्यमंत्री धामींची कडक भूमिका, नऊ दिवसांत तीन केले सील!

Big News Uttarakhand Chief Minister Dhami says will form a committee for uniform civil code as soon as new government is formed

या बेकायदेशीर मदरशांमधून ४८ मुलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश अल्पवयीन मुली आहेत.

विशेष प्रतिनिधी

नैनिताल :  उत्तराखंडमध्ये अवैध अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात सुरू असलेल्या अवैध मदरशांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर अवघ्या  नऊ दिवसांत तीन अवैध मदरशांचा पर्दाफाश झाला आहे. या बेकायदेशीर मदरशांमधून 48 मुलांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश अल्पवयीन मुली आहेत. Chief Minister Dhamis strict stance against illegal madrassas in Uttarakhand three banana seals in nine days

धामी सरकारने उत्तराखंडमधील सर्व मदरशांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी नैनिताल जिल्ह्यातील जियोलीकोटमध्ये बेकायदेशीरपणे मदरसा चालवल्याचे प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये मदरशात शिकणाऱ्या मुलाच्या कुटुंबीयांनी डीएमला पत्र लिहून मदरशाची सत्यता सांगितली होती, त्यानंतर प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मदरशावर छापा टाकला, तिथून २४ मुलांची सुटका केली आणि मदरसा सील केला.

हैदराबादमध्ये कर्नाटकच्या मंत्र्यावर नोटांचा पाऊस, VIDEO व्हायरल झाल्यानंतर भाजपाने साधला निशाणा

मुख्यमंत्र्यांनी दिल्या मदरशांची पडताळणी करण्याच्या सूचना –

ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येताच मुख्यमंत्री  धामी यांनी राज्यातील सर्व मदरशांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. याचाच परिणाम असा झाला की, गेल्या काही दिवसांत उधमसिंह नगर जिल्ह्यातील किच्छा येथे आणखी दोन बेकायदेशीरपणे चालवलेले मदरसे उघडकीस आले असून त्यांना सील करण्यात आले आहे.

Chief Minister Dhamis strict stance against illegal madrassas in Uttarakhand three banana seals in nine days

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात