भाजपच्या घराणेशाहीवर राहुल गांधींचे प्रहार; पण काँग्रेसला सहन तरी होतील का त्यांचे तिखट प्रतिवार??


भाजपच्या घराणेशाहीवर राहुल गांधींचे प्रहार; पण काँग्रेसला सहन होतील का त्यांचे तिखट प्रतिवार??, असे असा सवाल करण्याची वेळ खुद्द राहुल गांधींच्याच वक्तव्यातून आली आहे. कारण काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर मिझोराम मधल्या पत्रकार परिषदेत प्रश्न पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधींनी भाजपची घराणेशाही काढली. अमित शाह यांचा मुलगा काय करतो??, राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो??, अनुराग ठाकूर कोणत्या घराणेशाहीतून येतात??, वगैरे प्रश्न विचारून राहुल गांधींनी भाजपच्या घराणेशाहीवर प्रहार केला. Rahul Gandhi targets BJP over its dynastic politics, but will Congress be able to digest his own Sermon??

तो अर्थातच विशिष्ट मर्यादेपर्यंत सत्यच आहे. इतकेच काय, पण भाजप मधली घराणेशाही राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या नावांपुरती देखील मर्यादित नाही. त्यापलीकडे देखील अनेक नावे घराणेशाहीची म्हणून घेता येतील. पण म्हणून राहुल गांधींनी घराणेशाही संदर्भात भाजपवर केलेला प्रहार हा 100% सत्यच आहे आणि काँग्रेस त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपातून मुक्त होऊ शकते, असे मात्र बिलकुल नाही.

उलट राहुल गांधींनी भाजपवर घराणेशाहीचा आरोप लादण्यापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा भाजपच्या वेगवेगळ्या प्रवक्त्यांनी राजकीय घराणेशाही म्हणजे काय??, याचे वारंवार स्पष्ट खुलासे केलेच आहेत. कोणा एका नेत्याच्या मुलाला केवळ तो त्या घराण्यातला आहे, म्हणून राजकारणात प्रवेश नाकारता येणार नाही. पण म्हणून लगेच त्या नेत्याच्या नावाने किंवा त्या नेत्याच्या मुला – मुलीच्या नावाने पक्ष चालविणे, पक्षाचा संपूर्ण वारसा त्या नेत्याने आपल्या मुलाला अथवा मुलीलाच देणे ही खरी घराणेशाही असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे आणि त्याकडे तटस्थपणे पाहिले, तरी तथ्य दिसते.

भाजप मध्ये नेत्यांच्या मुलांना तिकिटे देऊन नगरसेवक, आमदार, खासदार केल्याची उदाहरणे निश्चितच आहेत, पण म्हणून भाजप नावाचा पक्ष हा नेत्यांची मुले चालवतात, असे बिलकुल म्हणता येणार नाही.



उलट भाजपच्या हायकमांड मध्ये कुठलीच घराणेशाही कधी खपवून घेतल्याचे अपवादात्मक देखील उदाहरण नाही. अगदी जनसंघाच्या स्थापनेपासून ते भाजपच्या विद्यमान अध्यक्षांपर्यंत एकही अध्यक्ष कुठल्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतो, याचे उदाहरण देता येणार नाही. किंबहुना भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात देखील भाजपने घराणेशाहीला स्थान ठेवलेले नाही. म्हणजे भाजपमध्ये नेत्यांच्या मुलांना कुठल्याही निवडणुकीची तिकीट द्यायची की नाही??, हे भाजप मधले त्या मुलांचे आई-वडील न ठरवता भाजपचे संसदीय मंडळ ठरवत असते हे इथे अधोरेखित केले पाहिजे.

त्याउलट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती, द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यासारखे पक्ष आधी नेते चालवतात आणि त्यानंतर नेत्यांची मुले चालवतात, याची बक्कळ उदाहरणे जनतेसमोर आहेत.

काँग्रेसमध्ये गांधी घराणे हे “सिमेंटिंग फोर्स” आहे, अशी भलामण शरद पवार करतात. मग बाकीचे नेते काय दगड, माती आणि विटा आहेत का??, की जे गांधी घराणे आपल्या “सिमेंटिंग फोर्स”च्या आधारावर वाटेल तसे अड्जस्ट करून काँग्रेसची भिंत बांधतात??… पण एखादे अर्ग्युमेंट पवारांनी केले म्हणजे ते वज्रलेप आणि चाणक्याचेच आहे, असे मानण्याचा प्रघात असल्याने त्याविषयी कोणी मूलगामी प्रश्न उपस्थित करीत नाही, म्हणून ते धकून जाते, पण खरंच गांधी घराणे हे जर काँग्रेसचे “सिमेंटिंग फोर्स” असेल, तर बाकीचे नेते दगड, माती अथवा विटांच्याच किंमतीचे आहेत, असाच त्याचा अर्थ होतो, यात काय संशय??

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींच्या भाजपवरच्या घराणेशाही प्रहाराचा मुद्दा पाहिला, तर त्यातला वार काँग्रेसला तरी सहन होईल का?? हा प्रश्न पडतो. उद्या खरंच काँग्रेसमध्ये स्वतः गांधी घराण्याने पक्षातल्या निर्णय प्रक्रियेपासून बाहेर बाजूला व्हायचे ठरविले आणि सर्वसामान्य नेता अथवा कार्यकर्ता म्हणून काम करायचे ठरविले, तर काँग्रेस एवढी मजबूत संघटना म्हणून तरी उरली आहे का?? की ती वेगवेगळ्या फळ्यांमधल्या नेत्यांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या आधारावर अखंड आणि एकत्रित टिकून राहील, हा खरा आणि गंभीर प्रश्न आहे.

गेल्या 70 वर्षांमध्ये गांधी नेहरू घराण्याच्या “सिमेंटिंग फोर्सने” काँग्रेस मधल्या दगड, माती आणि विटा एवढ्या कमकुवत आणि ठिसूळ करून ठेवल्या आहे, की एकेकाळी आपण मजबूत होतो आणि आपल्या आधारावर काँग्रेस नावाच्या संघटनेची बळकट इमारत संपूर्ण देशभर उभी होती, हे काँग्रेसच्या सर्व फळ्यांमधले नेते आणि कार्यकर्ते पूर्णपणे विसरून गेले आहेत!!

भाजप करेल, ते काँग्रेस करू शकेल का??

उद्या भाजप हायकमांडने ठरविले तर, भाजप मधली पक्षांतर्गत घराणेशाही ते मिनिटभरात संपुष्टात आणू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसा 75 वय असलेल्या नेत्यांना तिकीट नाही हा अलिखित नियम तयार करून बहुतेकांना रिटायर केले किंवा मार्गदर्शक मंडळात बसविले, तसाच एखादा झटका देणारा निर्णय भाजपने घेतला, तर पक्षांतर्गत घराणेशाही भाजप मिनिटभरात संपुष्टात आणू शकेल. पण तसे काँग्रेस किंवा बाकीचे घराणेशाही पक्ष करण्याची शक्यता तरी आहे का??, तशी त्यांची हिंमत आहे का??, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे भाजपवर घराणेशाहीचा प्रहार करणे सोपे आहे, पण त्यातला प्रतिवार आपल्यावरच आला, तर तो सहन करणे काँग्रेस आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांसाठी अवघड आहे, ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

Rahul Gandhi targets BJP over its dynastic politics, but will Congress be able to digest his own Sermon??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात