फडणवीसांच्या निकटवर्ती नेत्याचा ठाकरेंशी संपर्क की माध्यमेच फेक न्यूज देऊन टीआरपी वाढविण्यात दंग??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या येणार त्यामध्ये मोदी 400 पार जाणार की 400 च्या आत राहणार??, याविषयी सगळ्या जगात चर्चा चालू असताना महाराष्ट्रात छोट्या-मोठ्या राजकीय हालचाली घडत आहेत. त्याच्या बातम्या मराठी माध्यम मात्र मोठ्या देत आहेत. अशीच एक “मोठ्ठी” घडामोड घडत असल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालवली. A leader close to Fadnavis contacts Thackeray

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निकटवर्ती नेत्याने म्हणे, उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांची उद्याची अपॉइंटमेंट मागितली. उद्या सायंकाळी 5.00 वाजता फडणवीसांचा निकटवर्ती नेता उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन “गेट वेल सून” असे म्हणण्याचा डाव आखतो आहे, अशी बातमी साम टीव्हीने आमदार प्रसाद लाड यांचे नाव घेऊन दिली. स्वतः प्रसाद लाड यांनी फेक न्यूज म्हणून ती बातमी फेटाळली, पण सूत्रांच्या हवाल्याने साम टीव्हीने तशीच बातमी पुढे चालवली. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार का??, याची हवेतली चर्चा अधिक गहिरी झाली.

इथेच प्रसाद लाड आहेत जे आधी शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते 2014 नंतर ते भाजपमध्ये आले आणि ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचे नॅरेटिव्ह माध्यमांनी चालवले.

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपर्क साधण्याच्या बेतात असल्याची बातमी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केरसरकर यांनी “फोडली”च होती. त्या बातमीचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ठाम शब्दांमध्ये इन्कार केला होता पण या बातमीच्या निमित्ताने ठाकरे + भाजपचा संपर्क हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. प्रसाद लाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार अशी बातमी चालवून साम टीव्हीने तो पुढे नेला.

भाजपचे नेते जर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असली तर तो आमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रात चांगले यश मिळणार आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

पण या सगळ्यांमध्ये मुळात स्वतः प्रसाद लाड यांनी ती फेक न्युज आहे ती इतरांनी कोणीतरी परस्पर चालवली म्हणून ती खरी मानायचे कारण नाही असे जाहीररित्या बोलून त्या बातमीतली हवा काढून घेतली, तरी देखील साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने ती बातमी चालवली. या निमित्ताने टीआरपी वाढतो का??, याची चाचपणी केली.

A leader close to Fadnavis contacts Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात