Sputnik Light Vaccine : रशियाच्या सिंगल डोस व्हॅक्सिनला मंजुरी, ७९.४ टक्के इफिकसी, कोरोनाच्या सर्व रूपांना रोखण्यात सक्षम

Russian single-dose Sputnik Light vaccine has 79.4 pc efficacy, effective against all new coronavirus strains

Russian single-dose Sputnik Light vaccine : रशियाने पुन्हा जगाला दाखवून दिले की, कोरोना लस बनवण्यात ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. रशियाने सिंगल डोस लस ‘स्पुतनिक लाइट’च्या वापराला मंजुरी दिली आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही लस तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) आर्थिक मदत पुरविली आहे. Russian single-dose Sputnik Light vaccine has 79.4 pc efficacy, effective against all new coronavirus strains


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाने पुन्हा जगाला दाखवून दिले की, कोरोना लस बनवण्यात ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. रशियाने सिंगल डोस लस ‘स्पुतनिक लाइट’च्या वापराला मंजुरी दिली आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही लस तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) आर्थिक मदत पुरविली आहे.

आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पुतनिक-व्ही जी दोन डोसची लस असून 91.6 टक्के प्रभावी आहे, त्या तुलनेत सिंगल डोस असूनही स्पुतनिक लाइटने 79.4 टक्के इफिकसी दाखवली आहे. आता सिंगल डोस लस आल्यामुळे लसीकरणाला मोठी गती मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आरडीआयएफने नोंदवले की, या एक डोसच्या लशीची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी आहे.

स्पुतनिक-व्हीची मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 60 पेक्षा जास्त देशांनी रशियाच्या दोन डोसच्या स्पुतनिक-व्हीला वापरण्यास मान्यता दिली आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. रशियन लसीची पहिली तुकडीही भारतात पोहोचली आहे. शनिवारी रशियन विमानाने लसीचे दीड लाख डोस हैदराबादेत पोहोचले. आता ही लस आल्याने भारतातील लसीकरण मोहीम अधिक वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Russian single-dose Sputnik Light vaccine has 79.4 pc efficacy, effective against all new coronavirus strains

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात