महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, २१ कोटींचे ७ किलो युरेनियम जप्त, दोन जणांना अटक

Maharashtra ATS seizes 7 kg uranium worth Rs 21 crore, arrests two From Thane

Maharashtra ATS : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी दोन जणांना 7 किलो युरेनियमसह अटक केली आहे. ठाण्यातून अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी मागच्या अनेक दिवसांपासून युरेनियमच्या विक्रीसाठी खरेदीदाराचा शोध घेत होते. जप्त केलेल्या युरेनियमची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra ATS seizes 7 kg uranium worth Rs 21 crore, arrests two From Thane


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी दोन जणांना 7 किलो युरेनियमसह अटक केली आहे. ठाण्यातून अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी मागच्या अनेक दिवसांपासून युरेनियमच्या विक्रीसाठी खरेदीदाराचा शोध घेत होते. जप्त केलेल्या युरेनियमची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

एटीएस आता तपास करतंय की, या युरेनियमचा वापर स्फोटके बनविण्यासाठी करण्यात आला होता का? मिळालेल्या माहितीनुसार, अबू ताहिर (31) आणि जिगर पांडे (वय 27) अशी आरोपींची नावे आहेत. एका खासगी लॅबमध्ये या मुद्देमालाची चाचणीही घेण्यात आली आहे.

युरेनियमचा वापर प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पात वीज निर्मितीमध्ये केला जातो. यामुळे प्रतिबंधित असलेले युरेनियम तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना कुठून उपलब्ध झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. युरेनियमचा वापर लष्करी उद्देशानेही केला जातो. अशा परिस्थितीत, जर ते चुकीच्या हातात पडले, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Maharashtra ATS seizes 7 kg uranium worth Rs 21 crore, arrests two From Thane

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण