अनिल देशमुखांचे पाय खोलात, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली, देशमुख पुत्रांच्या ६ बनावट कंपन्याही CBIच्या रडारवर

6 firms owned by former minister Anil Deshmukhs sons Under CBI Radar, Bombay HC Also Rejects Plea

Anil Deshmukh : भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने देशमुखांना निर्देश दिले की, आवश्यक भासल्यास त्यांच्या खटल्याची निकड लक्षात घेऊन हायकोर्टाचे व्हेकेशन बेंच स्थलांतरित केले जावे. 6 firms owned by former minister Anil Deshmukhs sons Under CBI Radar, Bombay HC Also Rejects Plea


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने देशमुखांना निर्देश दिले की, आवश्यक भासल्यास त्यांच्या खटल्याची निकड लक्षात घेऊन हायकोर्टाचे व्हेकेशन बेंच स्थलांतरित केले जावे. भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. देशमुख यांच्या याचिकेवर 4 आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुटीनंतर होईल.

देशमुखांच्या बनावट कंपन्या, सीबीआय करणार चौकशी

दुसरीकडे, सीबीआयने देशमुखांभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. खंडणी आरोप प्रकरणात यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या नावे सहा बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांचीही सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदावर असताना दरमहा शंभर कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला आहे. त्यासंबंधी त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने देशमुख यांच्यासह अन्य संबंधितांची चौकशी केली होती. याबाबतचा अहवालही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यानंतर आता बनावट कंपन्यांची माहिती समोर आल्याने सीबीआयकडून त्यांचाही तपास होण्याची शक्यता आहे.

कुठे आहेत या कंपन्या?

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, या सर्व बनावट कंपन्यांचे मुख्यालय कोलकात्यात आहे. कोलकात्यात ज्या लाल बाजार भागात या कंपन्या आहेत, त्या भागात जवळपास ३८ हजार अशा बनावट कंपन्या आहेत. झोडिअॅक डीलकॉम, अयाटी जेम्स प्राइवेट लिमिटेड, काँक्रिट रिअल इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिस्टा रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड व काँक्रिट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा त्यात समावेश आहे. या पाचही कंपन्या अनिल देशमुख यांची मुले सलील व हृषिकेश यांच्या नावावर आहेत. यापैकी झोडिअॅक डीलकॉमच्या नावाने 16 लाख रुपयांची विक्री झाली आहे. कंपनीकडे सध्या 10.32 कोटी रुपयांची रोकड असून 7.56 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या बनावट कंपन्यांमध्ये काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता सीबीआय करणार आहे.

6 firms owned by former minister Anil Deshmukhs sons Under CBI Radar, Bombay HC Also Rejects Plea

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण