Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

Jacqueliene Fernandez

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Jacqueliene Fernandez  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन, सुकेश चंद्रशेखर आणि अन्य १५ आरोपींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Jacqueliene Fernandez

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी उपलब्ध पुरावे आणि तपासातील सामग्रीचा अभ्यास केल्यानंतर आरोपींविरोधात खटला चालविण्यासाठी पुरेसे प्राथमिक पुरावे असल्याचे नमूद केले. न्यायालयाने सर्व आरोपींना ३ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.Jacqueliene Fernandez



हे प्रकरण माजी उद्योगपती शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांच्याकडून सुमारे २०० कोटी रुपयांची कथित खंडणी उकळल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्ह्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगचा स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, सुकेश चंद्रशेखर याने बेकायदेशीररीत्या मिळालेल्या पैशांतून अनेक महागड्या भेटवस्तू खरेदी केल्या. या भेटवस्तू जॅकलिन फर्नांडिस यांना देण्यात आल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने केला आहे. त्यामुळेच जॅकलिन यांचे नाव पुरवणी आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी जॅकलिन फर्नांडिस यांनी या प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा दर्शवत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सक्तवसुली संचालनालयाने त्याला तीव्र विरोध केला. जॅकलिन या केवळ साक्षीदार नसून प्रकरणातील लाभार्थी असल्याचा दावा यंत्रणेने केला होता. त्यानंतर जॅकलिन यांनी स्वतःच सरकारी साक्षीदार होण्याचा अर्ज मागे घेतला.

या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस यांच्यावर थेट खंडणी प्रकरणाचा आरोप नसला तरी मनी लॉन्डरिंग प्रकरणात त्यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. दुसरीकडे, सुकेश चंद्रशेखर याच्यावर खंडणी, संघटित गुन्हेगारी आणि मनी लॉन्डरिंगसह अनेक गंभीर आरोप आहेत.

न्यायालयाच्या या आदेशानंतर आता या बहुचर्चित प्रकरणातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, पुढील काही महिन्यांत साक्षीदारांची तपासणी आणि पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Court Orders Framing of Charges Against Jacqueliene Fernandez and Sukesh Chandrashekhar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात