नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!, हेच राजकीय वास्तव आज पश्चिम बंगाल मधून पुन्हा समोर आले.Attacks in West Bengal; Kalyan Banerjee comes forward after Abhishek Banerjee!!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचा पराभव केल्यानंतर सुद्धा जनतेचा त्यांच्या विरोधातला रोष कमी झाला नाही. त्याचाच फटका काल अभिषेक बॅनर्जी यांना बसला. कोलकत्या जवळ कमरपुरामध्ये महिलांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकली. त्यांचा शर्ट फाडला. त्यांना धक्काबुक्की केली. या सगळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या पाठोपाठ ममता बॅनर्जी यांना अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची राजकीय नौटंकी करायची संधी मिळाली. अभिषेक बॅनर्जी यांना ठार मारायचाच कट होता. पण त्याने हेल्मेट घातल्यामुळे तो वाचला, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले. अभिषेक बॅनर्जी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, पण तिथे जाऊन सुद्धा ममता बॅनर्जी यांनी दमदाटी केली. अभिषेक बॅनर्जींना डिस्चार्ज देण्यासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने हॉस्पिटल प्रशासनावर दबाव आणण्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
– राहुल गांधींचा ममतांना फोन
त्या पाठोपाठ राहुल गांधींचा ममता बॅनर्जी यांना फोन केला. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कोलकत्ता सोडून इतरत्र हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा उपचार करू, अशी ऑफर राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांना दिली. जणू काही कोलकत्ता किंवा पश्चिम बंगाल मधल्या कुठल्याच हॉस्पिटलमध्ये अभिषेक बॅनर्जींवर चांगले उपचार होणार नाहीत, असा आव राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी आणला. इकडे मुंबईतून संजय राऊत यांनी सुद्धा ममतांना सहानुभूती दाखविली.
Hooghly, West Bengal: TMC MP Kalyan Banerjee was reportedly attacked in Hooghly while going to submit a deputation at Chanditala Police Station. He was surrounded by protesters who showed black flags, raised slogans, and allegedly assaulted him during the incident pic.twitter.com/oYRP0YCr5d — IANS (@ians_india) May 31, 2026
Hooghly, West Bengal: TMC MP Kalyan Banerjee was reportedly attacked in Hooghly while going to submit a deputation at Chanditala Police Station. He was surrounded by protesters who showed black flags, raised slogans, and allegedly assaulted him during the incident pic.twitter.com/oYRP0YCr5d
— IANS (@ians_india) May 31, 2026
– कल्याण बॅनर्जींची नौटंकी
पण ममता बॅनर्जी यांची ही राजकीय नौटंकी कालच्या पुरतीच मर्यादित राहिली नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आज त्या नौटंकीत हुगळी मधून सामील झाले. ते तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये निवडणूक हिंसाचाराचा तक्रार अर्ज दाखल करायला गेले होते. त्यावेळी म्हणे, त्यांच्यावर कुणीतरी मागून दगड फेकून हल्ला केला. कल्याण बॅनर्जी यांच्या वरच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ते एका ट्रक समोरून घोषणा देत चाललेत. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना अडवले आणि तिथेच कल्याण बॅनर्जी आपल्या डोक्याला हात लावून खाली पडले, पण प्रत्यक्षात कुठला दगड त्यांच्या डोक्यावर येऊन धडकल्याचे त्या व्हिडिओत दिसले नाही. पण कल्याण बॅनर्जी यांनी तिथेच खाली पडून फोनवर बोलायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी लगेच त्यांना पंखा घालायला सुरुवात केल्याचे सुद्धा या व्हिडिओत दिसले.
हे तेच कल्याण बॅनर्जी आहेत, ज्यांच्या विरोधात ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार काकुली घोष यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. कल्याण बॅनर्जी यांनी आपल्याला भर लोकसभेत शिवीगाळ केल्याचे काकुली घोष यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
#WATCH | Hooghly, West Bengal: TMC MP Kalyan Banerjee was allegedly attacked near Chanditala Police Station when he came to submit a deputation regarding post-poll violence. More details awaited. pic.twitter.com/47XaGsbL0q — ANI (@ANI) May 31, 2026
#WATCH | Hooghly, West Bengal: TMC MP Kalyan Banerjee was allegedly attacked near Chanditala Police Station when he came to submit a deputation regarding post-poll violence.
More details awaited. pic.twitter.com/47XaGsbL0q
— ANI (@ANI) May 31, 2026
– राजकीय नौटंकी
वास्तविक पश्चिम बंगाल मधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली. पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांचा ममतांच्या आणि अभिषेक बॅनर्जींच्या नेतृत्वावर विश्वास उडाला. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. तरीसुद्धा ममता बॅनर्जींना त्यांना रोखता आले नाही. त्यामुळेच आता ममता बॅनर्जी पक्षातली गळती रोखण्यासाठी हल्ल्यांची नौटंकी सुरू केली. त्यात कल्याण बॅनर्जी सुद्धा सामील झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App