बंगाल हिंसाचारातील मृतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून मदत जाहीर, प्रत्येक दोन लाखांची भरपाई

Chief Minister Mamata Banerjee announces aid to victims of Bengal violence, compensation of Rs 2 lakh each

Chief Minister Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या की, कोणताही भेदभाव न करता नुकसान भरपाई दिली जाईल. जेव्हा निवडणूक आयोगाकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी होती, तेव्हा हिंसाचारात 16 जण मरण पावले. त्यातील निम्मे टीएमसी आणि निम्मे भाजपचे होते. संयुक्त आघाडीशी संबंधित होते.” Chief Minister Mamata Banerjee announces aid to victims of Bengal violence, compensation of Rs 2 lakh each


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या की, कोणताही भेदभाव न करता नुकसान भरपाई दिली जाईल. जेव्हा निवडणूक आयोगाकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी होती, तेव्हा हिंसाचारात 16 जण मरण पावले. त्यातील निम्मे टीएमसी आणि निम्मे भाजपचे होते. संयुक्त आघाडीशी संबंधित होते.”

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “भाजप नेते येथे फिरत आहेत आणि लोकांना भडकावत आहेत. नवीन सरकारला 24 ताससुद्धा झालेले नाहीत, ते पत्र पाठवत आहेत, त्यांची टीम येत आहे आणि त्यांचे नेते येथे येत आहेत. ते जनादेश स्वीकारण्यास खरोखर तयार नाहीत. मी त्यांनी जनतेचा आदेश स्वीकारण्याची विनंती करते.”

दरम्यान, 2 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. परंतु राज्य सरकारने अद्याप अहवाल पाठवलेला नाही.

यानंतर निवडणुकांनंतर झालेल्या कथित हिंसाचाराच्या कारणांची चौकशी करण्यासाठी व राज्यातील सद्य:स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने चार सदस्यांची एक टीम गठित केली आहे. अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वात ही टीम पश्चिम बंगालमध्ये पोहोचली आहे.

इतकेच नव्हे तर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे हिंसाचाराच्या घटनांचा अहवालही मागविला आहे. राज्यपालांना परिस्थितीचा आढावा घेत लवकरात लवकर मंत्रालयात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Chief Minister Mamata Banerjee announces aid to victims of Bengal violence, compensation of Rs 2 lakh each

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात