क्या बात ! जनसेवेस तत्पर गडकरींच्या प्रयत्नांनी मिळाला वर्ध्यातील कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाचा परवाना ; दरदिवशी तयार होणार ३० हजार रेमडेसिव्हीर


विशेष प्रतिनिधी

वर्धा : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे .सर्वत्र ऑक्सिजन इंजेक्शन आणि बेडसाठी मारामार सुरू आहे .तर रेमडेसिव्हीर औषधाचा देखील तुटवडा जाणवत आहे. संकट काळात संपूर्ण निष्ठेने काम करणारे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी म्हणजेच संकटमोचक यांनी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाचा परवाना मिळवून दिला आहे .

या कंपनीत आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी दरदिवशी ३० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे.  Union Minister Nitin Gadkari gave license for the production of remedivir to Wardha based company

आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती

वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला होता  .

नितीन गडकरी यांनी रेमडेसिव्हीर उत्पादन करणाऱ्या जेनेटिक सायन्स कंपनीचा आढावा घेतला. तसेच याचे उद्धाटन नितीन गडकरींचे हस्ते करण्यात आले आहे. त्यासोबतच जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ.महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येणार आहे.  हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

Union Minister Nitin Gadkari gave license for the production of remedivir to Wardha based company

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात