राज्यातील कोरोना संकटादरम्यान ठाकरे सरकारने काढले आमदार निवासाचे बांधकाम, मनोरा उभारण्यासाठी तब्बल ९०० कोटींचे टेंडर

Maharashtra Government 900 Crore rupees Tender To Rebuild MLA Hostel Manora amid Corona Crisis

MLA Hostel Manora : अवघ्या देशात तसेच राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या तुटवड्याच्या अभावी रुग्णांचे जीव जाताहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत ठाकरे-पवार सरकारने मनोरा आमदार निवासाच्या बांधकामासाठी वृत्तपत्रांतून जाहिरात दिली आहे. तब्बल 900 कोटींच्या या प्रकल्पावर विरोधी पक्ष भाजपने कडाडून टीका केली आहे. Maharashtra Government 900 Crore rupees Tender To Rebuild MLA Hostel Manora amid Corona Crisis


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अवघ्या देशात तसेच राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या तुटवड्याच्या अभावी रुग्णांचे जीव जाताहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत ठाकरे-पवार सरकारने मनोरा आमदार निवासाच्या बांधकामासाठी वृत्तपत्रांतून जाहिरात दिली आहे. तब्बल 900 कोटींच्या या प्रकल्पावर विरोधी पक्ष भाजपने कडाडून टीका केली आहे.

मागच्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या मनोरा आमदार निवासच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने तब्बल 900 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यासाठी विविध वृत्तपत्रांतून जाहिराती देण्यात आल्या आहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की, “MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसद भवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना!” अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

धोकादायक ठरल्याने मनोराचे पुनर्बांधकाम

नरिमन पॉइंट परिसरात मनोरा आमदार निवास आहे. 1996 मध्ये आमदार निवासचे बांधकाम पूर्ण झाले होते. परंतु बांधकामाच्या सुमार दर्जामुळे अवघ्या 20 वर्षांतच सदनिकांतील प्लॅस्टर कोसळणे, छळ कोसळण्याच्या घटना घडल्या. 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवासाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यानुसार इमारत धोकादायक ठरल्याने 2018 पासून आमदार निवास बंद करण्यात आले होते.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधानांवर टीका

कोरोना संकटाचाच दाखला देत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून तसेच राहुल गांधी व प्रियांका गांधींकडून पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सेंट्रल व्हिस्टावरून पीएम मोदींवर टीका करत म्हटले होते की, 13450 कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टाऐवजी 45 कोटी भारतीयांचे लसीकरण किंवा 1 कोटी ऑक्सिजन सिलिंडर्स किंवा 2 कोटी कुटुंबांना 6000 रुपये देऊन न्याय महत्त्वाचा आहे. पण पंतप्रधानांचा अहंकार लोकांच्या जीवितापेक्षाही मोठा झाला आहे.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

कोरोना संकटाचा हवाला देऊन काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा देशातील लोक ऑक्सिजन, लसी, हॉस्पिटल बेड, औषधांच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत, तेव्हा सरकारने 13000 कोटी रुपयांनी पंतप्रधानांचे नवे घर बांधण्याऐवजी सर्व संसाधने लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरले तर बरे झाले असते. अशा प्रकारच्या खर्चांमुळे जनतेत संदेश जातो की, सरकारची प्राथमिकता दुसऱ्याच दिशेला आहे.

Maharashtra Government 900 Crore rupees Tender To Rebuild MLA Hostel Manora amid Corona Crisis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात