अमेरिकेने टाकले एक पाउल पुढे, लस घेतलेल्यांना आता नाही मास्कची गरज नाही


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यगकता नाही, असे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने (सीडीसी) जाहीर केले आहे. यामुळे जनजीवन सुरळीत करण्याच्या दिशेने अमेरिकेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.No mask compulsion in USA

अमेरिकेत ११४ दिवसांमध्ये लशीचे २५ कोटी डोस नागरिकांना दिले गेले आहेत. अमेरिकेत लसीकरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून देशातल्या ५० पैकी ४९ राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने घटत आहे.रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोरोगा रुग्णांची संख्या प्रचंड कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही ८० टक्क्यांनी कमी झाले आहे.‘कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना संसर्गाचा अत्यंत कमी धोका आहे.

त्यामुळे अमेरिकेने एक मोठे पाऊल टाकले आहे. देशातील लसीकरणाला वेग आणल्याने आपल्याला हे यश मिळाले आहे,’ असे बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, ज्यांनी अद्याप लस घेतली नसेल,

किंवा लशीचा एकच डोस घेतला असेल, त्यांनी मास्कचा वापर करणे आवश्य क आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.या ‘सीडीसी’ने ही घोषणा केल्यानंतर काही वेळानेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस हे विनामास्क दाखल झाले.

No mask compulsion in USA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण