बिटकॉइनद्वारे कार खरेदीला एलॉन मस्क यांनीच लावला करकचून ब्रेक

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून टेस्ला कार खरेदी करण्याच्या योजनेला ब्रेक लावला आहे. मस्क यांच्या या भूमिकेमुळे बिटकॉइनच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत आहे.Tesla will not sell car in bitcoin

टेस्लाने बिटकॉइनचे व्यवहार रद्द केले असले तरीसुद्धा कंपनी अन्य क्रिप्टोकरन्सी वापराची शक्यता पडताळून पाहत आहे. प्रत्येक व्यवहारामागे एक टक्क्यांपेक्षाही कमी ऊर्जा खर्च होईल असा चलन पर्याय कंपनीकडून शोधला जात आहे.पर्यावरणाच्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे.संगणकाच्या माध्यमातून होणारे बिटकॉइन मायनिंग आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर जैव इंधन जाळले जाते.

यामध्ये कोळशाचा समावेश होतो. हे सर्वांत वाईट उत्सर्जन असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. टेस्लाने या वर्षाच्या प्रारंभी १.५ अब्ज डॉलर एवढ्या बिटकॉइनची खरेदी केली होती.

त्यातील १० टक्के बिटकॉइनची ही खुल्या बाजारात विक्री करण्यात आली होती. शिल्लक बिटकॉइनच्या किमती एवढी रक्कम टेस्लाच्या खात्यावर आजही जमा आहे.

Tesla will not sell car in bitcoin

महत्त्वाच्या बातम्या