वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या न्यायाधिकरणाने इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला परदेशी नागरिक आणि परदेशी कंपन्यांकडून निधी घेतल्याबद्दल दोषी ठरवले आहे. न्यायाधिकरणाने सांगितले की, पीटीआयने आपल्या बँक खात्याबाबत बनावट प्रतिज्ञापत्र दिले आणि 13 बँक खात्यांची माहिती दडवली.Imran Khan’s Troubles Rise, Slams Over Foreign Funds Received by Party, Chances of Sanctions
पाकिस्तानमध्ये राजकीय पक्ष विदेशी नागरिक वा कंपन्यांकडून निधी घेऊ शकत नाहीत. या निर्णयानंतर इम्रान आणि त्यांच्या पक्षावर निर्बंध लादण्याचे सावट आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, पीटीआयने 16.51 कोटी रुपयांचा विदेशी निधी घेतला होता.
आयोगाने पीटीआयला नोटीस देऊन विचारले होते की, ही रक्कम का जप्त केली जाऊ नये? दुसरीकडे, पीटीआयने आरोपांचे खंडन करत सांगितले की, या निर्णयाला आव्हान दिले जाईल. पक्ष प्रवक्ते फवाद चौधरी म्हणाले, ज्या निधीबाबत बोलले जात आहे, तो परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी पाठवला होता.
या प्रकरणाची तक्रार पीटीआयचे संस्थापक आणि इम्रान यांचे माजी निकटवर्तीय अकबर एस. बाबर यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App