Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी; टेबल टेनिस मध्ये पुरुषांना सुवर्णपदक!!


वृत्तसंस्था

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एका पाठोपाठ एक विक्रम करत आहेत. यात सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदकांची कमाई करत आहेत. आता मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. लॉन बॉल (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक मिळवले. Golden performance of Indian women in lawn ball competition

भारतीय महिलांनी ही अव्वल कामगिरी करून काही वेळ उलटतोय ना तोच भारताच्या पुरुषांनी टेबल टेनिस स्पर्धेत सिंगापूर वर मात करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पारड्यात आज दोन सुवर्णपदकांची कमाई झाली आहे, तर वेटलिफ्टिंग मध्ये विकास सिंह याने रौप्य पदक मिळवले आहे.

 

भारताला एकूण 12 पदके

विशेष म्हणजे लॉन बॉल हा क्रीडा प्रकार भारतीयांसाठी अजिबात परिचित नव्हता. मात्र या क्रीडा प्रकारामध्ये या चार महिलांनी सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७ – १० असा विजय मिळवला. यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडील सुवर्ण पदकांची संख्या चार झाली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 12 पदके झाली आहेत.

आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी कडवी झुंज दिली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला.

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीचे सामने अजून सुरू व्हायचे आहे भारताचे कुस्तीगीरांचे पथक आजच बर्मिंगहॅमला रवाना झाले आहे.

Golden performance of Indian women in lawn ball competition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात