Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी!!

वृत्तसंस्था

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एका पाठोपाठ एक विक्रम करत आहेत. यात सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदकांची कमाई करत आहेत. आता मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. लॉन बॉल (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक मिळवले. Commonwealth Games 2022: Golden performance of Indian women in lawn ball competition

– भारताला एकूण १० पदके

विशेष म्हणजे लॉन बॉल हा क्रीडा प्रकार भारतीयांसाठी अजिबात परिचित नव्हता. मात्र या क्रीडा प्रकारामध्ये या चार महिलांनी सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७ – १० असा विजय मिळवला. यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडील सुवर्ण पदकांची संख्या चार झाली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १० पदके झाली आहेत.

आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी कडवी झुंज दिली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला.

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीचे सामने अजून सुरू व्हायचे आहे भारताचे कुस्तीगीरांचे पथक आजच बर्मिंगहॅमला रवाना झाले आहे.

Commonwealth Games 2022: Golden performance of Indian women in lawn ball competition

महत्वाच्या बातम्या