हातात चप्पल, पायात बूट नाहीत… मुलींसाठी धावणाऱ्या रमाबाईंना 1 लाखांची मदत

Vijaya Rahatkar

विशेष प्रतिनिधी

बीड : मुलींच्या शिक्षणासाठी साडी नेसून, हातात चप्पल घेऊन अंबाजोगाई येथे अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांच्या संघर्षाची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दखल घेतली आहे. रहाटकर यांनी रमाबाई यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले. तसेच त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. Vijaya Rahatkar

मुलींच्या शिक्षणासाठी एका आईने किती जिद्द, धैर्य आणि समर्पणाने संघर्ष करावा, याचे रमाबाई रणवीर या प्रेरणादायी उदाहरण असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले. त्यांच्या जिद्दीने आणि मातृत्वाच्या शक्तीने अनेकांना प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.



काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने विजया रहाटकर यांना प्रतिष्ठित ‘आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारासोबत मानचिन्ह आणि रोख रक्कमही देण्यात आली होती. रमाबाई यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी समोर आल्यानंतर त्या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून एक लाख रुपये रमाबाई यांना देण्याचा निर्णय रहाटकर यांनी घेतला.

“ही रक्कम रमाबाई यांच्या संघर्षाची किंवा त्यांच्या कर्तृत्वाची किंमत नाही. त्यांनी मला आणि समाजातील अनेकांना दिलेल्या प्रेरणेबद्दल कृतज्ञतेची ही एक छोटीशी अभिव्यक्ती आहे,” अशी भावना रहाटकर यांनी व्यक्त केली.

रमाबाई रणवीर या मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रहिवासी आहेत. रमाबाई आणि त्यांच्या दोन्ही मुलींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशीही रहाटकर यांनी चर्चा केली आहे. संबंधित कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीतही रमाबाई यांनी दाखवलेली अदम्य जिद्द आणि धैर्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या संघर्षाला सलाम करत विजया रहाटकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Financial aid of ₹1 lakh for Ramabai, who runs for girls. : Vijaya Rahatkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात