उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला दगडफेक; ते शिवसैनिक नव्हते, विनायक राऊतांचा खुलासा; 8 दिवसांत प्रत्युत्तर ; तानाजी सावंत


प्रतिनिधी

पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते, त्यावेळी मात्र कात्रज चौकात सामंतांच्या गाड्यांचा ताफा पोहचताच त्यांच्या गाड्यांवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यावेळी सामंतांच्या गाड्याच्या काचा फुटल्या. यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.Stone pelting attack on Udaya Samanta’s car; They were not Shiv Sainiks, reveals Vinayak Rauta; Reply in 8 days : Tanaji Sawant

मात्र उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे शिवसैनिक नव्हते, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे, तर मुळात तानाजी सावंत यांच्यावर हल्ला करायचा होता चुकून उदय सामंतांवर हल्ला झाला, असा हल्लेखोरांचा दावा आहे.



मात्र या मुद्द्यावरचा तानाजी सावंत यांनी येथील प्रत्युत्तर दिले आहे. येत्या आठ दिवसांत उदय सामंत यांच्या गाडीवरच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर मिळेल. माझे कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील. ते काय असेल हे मी आता सांगू शकत नाही, असे सूचक वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर हल्ला 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात होते. त्यावेळी आमदार सामंत हेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच होते. त्यानंतर आमदार सामंत हे मुंबईच्या दिशेने जाऊ लागले. त्यावेळी कात्रजच्या चौकात आमदार सामंत यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर चपला मारत बाटल्या फेकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकत असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडल्याचे बोलले जात आहे. कारण शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा ही पुण्यातील कात्रज भागातच सुरू होती.

Stone pelting attack on Udaya Samanta’s car; They were not Shiv Sainiks, reveals Vinayak Rauta; Reply in 8 days : Tanaji Sawant

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात