संजय राऊत म्हणाले, पेढे वाटा!!; बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने खरंच वाटले!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार सामनाचे कार्यकारी संपर्क संजय राऊत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात जाताना मोठ्याने ओरडून म्हणाले होते, महाराष्ट्र कमजोर होतोय. पेढे वाटा!! तुम्हाला लाज शरम वाटली पाहिजे. पेढे वाटा!!… आणि खरंच धुळ्यातल्या एका पठ्ठ्याने थेट राजधानी दिल्लीत जाऊन पेढे वाटले!! हा पठ्ठा दुसरा तिसरा कोणी नसून दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ड्रायव्हर होता. प्रकाश राजपूत असे त्यांचे नाव. Sanjay Raut said sweet share Balasaheb’s driver really felt it

प्रकाश राजपूत हे मूळचे धुळ्याचे आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीची हवा खावी लागली आणि प्रकाश रजपूत खुश झाले. त्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठत एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना पेढे वाटले.



संजय राऊत यांनी चुकीचे काम करून शिवसेनेचे वाटोळे केले आहे. ते कोठडीत गेले हे बरे झाले म्हणूनच मी पेढे वाटतो आहे, असे प्रकाश राजपूत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. प्रकाश रजपूत हे 1993 ते 2000 या कालावधीत बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते, असे खुद्द त्यांनीच सांगितले आहे.

Sanjay Raut said sweet share Balasaheb’s driver really felt it

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात