कोरोना व्हायरस चीनचे जैवीक अस्त्र, तिसऱ्या महायुध्दाची करतोय तयारी


कोरोना व्हायरसचा प्रचंड वेगाने होणारा प्रसार आणि त्यामुळे संपूर्ण जगावर झालेला परिणाम यामुळे हे चीनचे जैवीक अस्त्र असल्याचा संशय पहिल्यापासून व्यक्त होत आहे. खरोखरच कोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा आरोप द वीकेंड ऑस्ट्रेलियन या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता.Corona virus is China’s biological weapon, preparing for World War III


विशेष प्रतिनिधी

सिडने : कोरोना व्हायरसचा प्रचंड वेगाने होणारा प्रसार आणि त्यामुळे संपूर्ण जगावर झालेला परिणाम यामुळे हे चीनचे जैवीक अस्त्र असल्याचा संशय पहिल्यापासून व्यक्त होत आहे.

खरोखरच कोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा आरोप द वीकेंड ऑस्ट्रेलियन या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता.



या अहवालात चीनमधील एका शोधनिबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये चीन सार्स व्हायरसच्या मदतीने जैविक शस्त्र बनवत असल्याचे म्हटले आहे. चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी हे 2015 मध्येच कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करीत होते.

त्यावेळी चिनी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचा तिसऱ्या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून वापर केले जाईल असे म्हटले होते. त्यासोबतच त्याला योग्य प्रकारे हाताळत त्या व्हायरसचे महामारीत कसे रुपांतरन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या तपासणीबाबतचा मुद्दा समोर आल्यावर प्रत्येक वेळी चीन माघार घेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस कोणत्याही वटवाघुळच्या बाजारातून पसरलेले नाही.

कारण हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. रॉबर्ट यांनी चिनी रिसर्च पेपरवर सखोल अभ्यास केल्यावर म्हटले आहे की, हे संशोधन पेपर एकदम बरोबर असून आम्ही नेहमी चीनच्या रिसर्च पेपरवर अभ्यास करतो.

चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते आहेत. अमेरिका, भारतापासून ते आपल्या सर्व शेजाºयांशी त्यांनी कुरापती काढल्या आहेत. अगदी ऑस्ट्रेलिया सोबत त्यांचे भांडण आहे.

संपूर्ण जगाशी भांडण काढून विस्तारवादाचे धोरण चीनने अवलंबले आहे. त्यामुळेच तिसऱ्या महायुध्दाची तयारी त्यांच्याकडून सुरू असल्याचे दावे केले जात आहेत.

Corona virus is China’s biological weapon, preparing for World War III

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात