कोरोना व्हायरसबाबत केंद्राच्या नवीन मार्गदर्शक सूचना; जलतरण तलाव सर्वांसाठी खुले


गृह मंत्रालयाने एक नवा आदेश जारी केला आहे. अजून काही गोष्टींमध्ये शिथिलता आणल्याची माहिती दिली आहे.हा नवा आदेश 1 फेब्रुवारी 2021 पासून ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहील. new guidelines on corona virus Swimming pool open to all


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. आता गृह मंत्रालयाने एक नवा आदेश जारी करत अजून काही गोष्टींमध्ये शिथिलता आणल्याची माहिती दिली आहे. यामध्ये चित्रपटगृहे व स्विमिंग पूलबाबत दिलासादायक बातमी आहे.  • सामाजिक , धार्मिक , खेळ ,करमणूक ,शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक संमेलनांना हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% पर्यंत परवानगी आहे, ज्यामध्ये 200 जागांची कमाल मर्यादा आहे.
  • हा नवा आदेश 1 फेब्रुवारी 2021 पासून ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहील.
  • गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये पूर्वीच्याच आदेशातील काही नियम नमूद केले आहेत.
  • आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरू करण्यासाठी नागरी उड्डान मंत्रालय परिस्थितीच्या आकलनाच्या आधारे गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार.
  • सिनेमा हॉल आणि थिएटरना आसन क्षमतेच्या 50% पर्यंत आधीच परवानगी आहे. आता त्यांना जास्तीत जास्त आसन क्षमतेवर काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • जलतरण तलावांना क्रीडा व्यक्तींच्या वापरासाठी आधीच परवानगी देण्यात आली आहे. आता जलतरण तलावांचा सर्वांनी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • याआधी व्यवसाय ते व्यवसाय प्रदर्शन हॉलला परवानगी देण्यात आली आहे. आता सर्व प्रकारच्या प्रदर्शन हॉलला परवानगी देण्यात येईल.
  • दरम्यान, देशात अजूनही साथी रोगावर पूर्णपणे मात केली गेली नाही, त्यामुळे अजूनही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एमएचए आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना एसओपीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

new guidelines on corona virus Swimming pool open to all

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती