Imran Khan : अमेरिका आणि पाक सैन्याच्या संगनमतातून इम्रान खान यांची उचलबांगडी झाल्याचा खुलासा, इम्रान यांच्या रशिया दौऱ्यामुळे अमेरिका नाराज

Imran Khan

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन डीसी : Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पाडण्यामागील कारण एका गौप्यस्फोटाद्वारे समोर आले आहे. लीक झालेल्या दस्तऐवजांच्या आधारे असा दावा केला आहे की, इम्रान यांची सत्ता अविश्वास ठरावाने गेली नव्हती. त्यामागे अमेरिकेचा कट व पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती. इम्रान यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला होता.Imran Khan

इम्रान यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका नाराज होती. युक्रेनबाबत इम्रान सरकारने तटस्थ भूमिका घेतली. ७ मार्च २०२२ रोजी वॉशिंग्टनमध्ये तत्कालीन राजदूत असद मजीद खान आणि अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री डोनाल्ड लू यांच्यात चर्चा झाली. मजीद यांना सांगितले की, अविश्वास ठरावाद्वारे इम्रान सत्तेतून हटले तर अमेरिका ‘सर्व काही माफ’ करेल. नंतर ३३ दिवसांत ९ एप्रिल २०२२ ला सरकार कोसळले.Imran Khan



सत्ता गेल्यानंतर इम्रान खान यांच्यावर १८८ गुन्हे दाखल

२०२२ मध्ये सरकार कोसळल्यानंतर सैन्यसमर्थित सरकारने इम्रान खान यांच्याविरोधात किमान १८८ गुन्हे दाखल केले आहेत. ऑगस्ट २०२३ पासून ते तुरुंगात असून सध्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. तोशाखाना गुन्हेगारी प्रकरण, सायफर प्रकरण, यांसारखी महत्त्वाची प्रकरणे त्यांच्याविरोधात सुरू आहेत.

बैठकीनंतर संरक्षण काढले; विरोधकांना मार्ग मोकळा

या बैठकीनंतर पाकिस्तानात राजकीय हालचाली वेगाने वाढल्या. सैन्याने इम्रान यांना दिलेले संरक्षण मागे घेतले. विरोधकांच्या अविश्वास ठरावाला मार्ग मोकळा करून सत्ता परिवर्तनासाठी वातावरण तयार करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने यापूर्वीही इम्रान यांच्याविरोधात कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे.

ट्रम्प काळात क्रिप्टो, खनिज, संरक्षण क्षेत्रात करार

ट्रम्प यांच्या काळात पाकिस्तान-अमेरिका संबंध व्यवहारकेंद्री बनल्याचे दिसले. पाकने सौदीसोबत संरक्षण करार केला. इम्रान यांनी तो नाकारला होता. क्रिप्टो कौन्सिलची स्थापना झाली आणि ट्रम्प कुटुंबाच्या एलएफ कंपनीसोबत करार झाला. दुर्मिळ खनिजांबाबत ५०० दशलक्ष डॉलरचा करारही केला.

वॉशिंग्टन: लंच टेबलवर इम्रान यांना हटवण्यासाठी दबाव टाकला

वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये डोनाल्ड लू यांनी पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत असद मजीद खान यांच्यासोबत लंचदरम्यान चर्चा सुरू होताच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्याचा दबाव टाकला होता.

लंचदरम्यान लू यांनी युक्रेन युद्धावर पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान रशियाची उघड टीका करत नाही आणि हे अमेरिका व युरोपला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

लू यांनी मजीद यांना स्पष्ट केले की, अमेरिका इम्रान यांच्या रशिया दौऱ्यामुळे नाराज आहे. त्यानंतर चर्चा अविश्वास ठरावावर आली. लू म्हणाले, “जर इम्रान हटले, तर सर्व काही माफ होईल.”

इम्रान यांच्यानंतर अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानच्या नव्या सरकारने युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा केला. हा पुरवठा अमेरिकन संरक्षण कंत्राटदार व तिसऱ्या देशांच्या माध्यमातून केला. त्यानंतर जुलै२०२३ मध्ये आयएमएफने पाकिस्तानसाठी ३ अब्ज डॉलरचे पॅकेज मंजूर केले.

Leaked Documents Reveal US-Pakistan Military Plot Behind Imran Khan’s Ouster

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात