पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, खरेदी करण्याऐवजी तिने ती सर्व रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली.
उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाल्याने कोठडीत वाढ करू नये असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
नसरापूर येथील चिमुकलीवरील अमानवी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल पुण्यात ‘महिला शक्ती समूह’ आणि ‘संघटित नारी शक्ती’ तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक आणि न्याय्य निकालाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ‘कलाकार कट्टा’ येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेने तीन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘एकसंघ भारताचा संकल्प’ आणि ‘नक्षलमुक्त भारत अभियान’ या ठरावांचा समावेश आहे
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा; तरीही शिंदे सेनेत कार्यकर्त्यांची भरती!!, असला प्रकार समोर आला.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवारी, ता २९) कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विमान प्रवासातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज मिश्किल पण ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?” अशा शब्दांत फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे.
पुण्यातील हत्या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या घटनेचे प्रात्यक्षिक (सीन रिक्रिएशन) केले. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी पोलिसांनी सिया गोयलला सकाळी साडेसहा वाजता किल्ल्यावर नेले होते.
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
अभिनेता सलमान खान आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील वांद्रे परिसरात नवीन घर बांधणार आहे. मात्र, सलमान आपल्या जुन्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सलमानचे कुटुंब सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहते. २०२४ मध्ये अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता.
जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन दावा समोर आला आहे. केतनचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या सुनील गायकवाड यांनी सांगितले की, केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, कवटी चिरडली होती आणि हात-पायांवरही अनेक ठिकाणी जखमा होत्या. इतर लोक रडत होते आणि मदतीसाठी ओरडत होते, पण सिया गोयल शांत उभी होती. ‘
मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या फैयाज प्रेमजी या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल आणि ५० किलो घातक रसायन जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतील एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी फुटल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून लाखो उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी केली आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीनंतर आता महाराष्ट्राला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीचा डाग लागला आहे. रविवार, २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागल्यानंतर, आता संपूर्ण राज्यातून या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी एकमुखी मागणी कडाडून होऊ लागली आहे. ७ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या ‘डबल लीक’ सरकारविरोधात विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या पेपरसाठी आरोपींनी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सखोल तपासासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यभरात आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर फुटल्याच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले.
वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!, असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरेंच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यामुळे आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आधी त्यांचे ४० आमदार निघून गेले, नंतर ६ खासदार निघून गेले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App