आपला महाराष्ट्र

Arvind Sawant

Arvind Sawant : ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचा पलटवार; “यशस्वी झाले असेल तर चेहरे दाखवा”, अरविंद सावंतांचे थेट आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर संबंधित खासदारांचे चेहरे आणि पुरावे जनतेसमोर आणा,” असे सावंत यांनी म्हटले आहे.

Operation Tiger

Operation Tiger : ऑपरेशन टायगर खरोखर यशस्वी की फक्त राजकीय दबावतंत्र?; ठाकरे-शिंदे संघर्षात सस्पेन्स कायम

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कथित ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही गूढतेच्या पडद्याआड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आपले सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.

Vidhan Parishad

Vidhan Parishad : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; ६ जागा बिनविरोध, २२ जूनला निकाल

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल.

Eknath Shinde

Eknath Shinde : ऑपरेशन टायगरला मोठा ब्रेक; ठाकरे गटातील दोन खासदारांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाचा दावा अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना आता या संपूर्ण घडामोडीत नवे वळण आले आहे. ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, कथित बंडखोरीशी संबंधित पत्रावर दोन खासदारांनी सहीच केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाचे कथित ‘ऑपरेशन टायगर’ अडचणीत येऊ शकते.

Congress merger

प्रादेशिक नेत्यांनी पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण काँग्रेसचा पर्याय का नाही स्वीकारला??

देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : पांढऱ्या पट्ट्यांऐवजी झाडं लावा; मनसेचा जैन समाजाला नवा प्रस्ताव, नितेश राणेंनाही टोला; वेदपाठकांना पाठिंबा कायम

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे

उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांची आधी भाजपच्या सत्तेमध्ये “सोय”; नंतर संजय राऊतांची त्यांना शिवीगाळ; अनिल देसाईंचे सुप्रीम कोर्टावर खापर!!

उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.

Jain Muni Nileshchandra

Jain Muni Nileshchandra : ‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

कुंभमेळा हा सामाजिक एकत्वाचे माध्यम; कुंभमेळ्यातील जनसहभाग विषयावर महामंथन

कुंभमेळा हा केवळ पर्वणी आणि स्नानापुरता मर्यादित नसून, त्याला व्यापक धार्मिक व सामाजिक भावजागरणाचे अंग आहे. काळानुरूप परिवर्तन आणि सामाजिक एकत्वाची भावना या पर्वणीतून अधिक दृढ होते.

Bawankule

Bawankule  : महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा; बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच पडीत सरकारी जमिनींचे संरक्षण आणि उत्पादनक्षम वापर हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Dattatray Bharne

Dattatray Bharne : ‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. कर्जमाफीचे नेमके स्वरूप आणि निकष ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफी जाहीर केली जाईल, अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान केले आहे.

Nagpur IAF Officer

Nagpur IAF Officer : एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या

नागपूरमध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे.

tutari

उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; पण शरद पवारांचे आठही खासदार सत्तेपासून वंचित!!

हो नाही करता करता अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेच. पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठहीच्या आठ खासदार सत्तेपासून वंचित राहून हात चोळत बसले.

maharashra

महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राची 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर!!

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची मोहीम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सुरू केली असून, आता त्याला केंद्र सरकारचे सुद्धा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!

महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलून महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण आज जाहीर केले. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजनावर भर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेतले.

पवनराजेंची 35 लाखांची सुपारी देऊन हत्या, २० वर्षांनंतरही न्यायाची प्रतीक्षा; आरोपी पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवर कोर्टात!!

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला.

Maharashtra Assembly

Maharashtra Assembly : राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Abhijeet Deepke

Abhijeet Deepke : CJP संस्थापक अभिजीत दीपकेंना तरुणांनी थप्पड मारली:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जयपूरममध्ये आंदोलन करत होते, आंदोलकांची हल्लेखोरांना मारहाण

जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

MMRD मधल्या वाहतूक व्यवस्थित क्रांतिकारी बदल; कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो 14 प्रकल्पाला मोठी गती!!

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.

Nitin Gadkari

Nitin Gadkari : आता गाड्या 100% इथेनॉलवर चालतील, सरकारची मंजुरी; गडकरी म्हणाले- 6 आठवड्यांत गाड्या लॉन्च, प्रदूषण व पेट्रोल खर्च होईल कमी

केंद्र सरकारने देशात 100% शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 13 जून रोजी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.

अण्णा हजारेंचा आज ९० वा वाढदिवस; सेंच्युरी पूर्ण करायचा विश्वास; एकनाथ शिंदेंबरोबर व्हिडिओ कॉल!!

ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Navnath Ban

Navnath Ban : ‘राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करतायत’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात