विशेष प्रतिनिधी
सांगली : Chandrakant Patil राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. “विठ्ठलाला साकडं घालून जर गोष्टी होत असत्या, तर या आधीही खूप झाल्या असत्या. त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका,” असा चिमटा चंद्रकांतदादांनी काढला. सांगलीच्या मिरज येथे शासकीय रुग्णालयातील विविध लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली.Chandrakant Patil
विठ्ठलाकडे काय मागावे?
दत्ता भरणेंच्या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विठ्ठलाला चांगला पाऊस पडू दे, पिके चांगली येऊ दे आणि रोगराई कमी होऊ दे, असे साकडं घालायचे असते.”Chandrakant Patil
जयंत पाटील आणि राष्ट्रवादीची भेट
वारकरी कुटुंबांना आर्थिक मदत
पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातातील पीडित कुटुंबांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. या अपघातात आता आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शासन नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला सुमारे 10 लाखांची मदत दिली जाईल (अपघात विमा 4 लाख + वारकरी विमा 4 लाख + गोपीनाथ मुंडे विमा 2 लाख). याव्यतिरिक्त, कोल्हापूरमधील एका पीडित कुटुंबातील मुलीला सीए (CA) चे शिक्षण घ्यायचे असल्याने, जोपर्यंत तिचे शिक्षण सुरू राहील तोपर्यंत तिला दरमहा 5000 रुपये स्वतःच्या ऑफिसमधून दिले जातील, अशी मोठी वैयक्तिक मदत त्यांनी जाहीर केली.
यावेळी प्रशासनावर सतत टीका करणाऱ्या खासदार विशाल पाटील यांनाही त्यांनी संयमाचा सल्ला दिला. “नम्र होऊन साखर खावी, असे अकांडतांडव करून काहीच होत नसते,” असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App