उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील क्रीडा संकुलाची पाहणी

विशेष प्रतिनिधी

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी बारामती येथे सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाची शुक्रवारी (ता. २८) पहाटे पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांकडून प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा तसेच कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना नियोजन, दर्जा आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बारामती आणि परिसरातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


स्थानिक खेळाडूंना नियमित सरावासोबतच विविध स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे संकुलाच्या कामात गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. क्रीडा संकुलाच्या कामाची प्रगती ठराविक कालावधीनंतर तपासून त्यानुसार आवश्यक नियोजन करावे. कामाचा वेग कायम ठेवतानाच बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ताही अबाधित राहील, याची दक्षता घेऊन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Sunetra Pawar inspects the sports complex in Baramati.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात