नेपाळमध्ये भीषण जलप्रलय; 392 जणांचा मृत्यू, 1,500 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले

विशेष प्रतिनिधी

नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या अचानक भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. जलप्रलयाच्या तडाख्यात इमारती, गावच्या गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत 392 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, 1,500 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. दरम्यान, 290 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नसल्याने त्यांच्या शोधासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

350 मजूर आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका

त्रिशूली हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या सुमारे 350 मजूर आणि कर्मचाऱ्यांची नेपाळी लष्कराच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे. या जलविद्युत प्रकल्पात अनेक भारतीय मजूरही काम करत होते. बोगद्यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात नेपाळी लष्कराला यश आले आहे.

नेपाळमध्ये पुन्हा धोक्याचा इशारा

दरम्यान, नेपाळ सरकारने आणखी एका संभाव्य संकटाचा इशारा दिला आहे. प्लॅनेट लॅब्स आणि लँडसॅटच्या उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणानुसार, रसुवागढी सीमेपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर ल्हेंदे नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे नदीच्या किनारी भागात तात्पुरत्या स्वरूपाचे सरोवर तयार झाले आहे.

या नैसर्गिक जलसाठ्याचा बांध फुटल्यास खालच्या भागातील परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


महाराष्ट्रातील 114 नागरिक नेपाळमध्ये अडकले

नेपाळमधील महापुरात महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधला असून, नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालिका श्रीमती ठक्कर यांच्याशीही संपर्क साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 53 नागरिक सुखरूप असून मानसरोवर परिसरात आहेत. मुंबईतील अनिल महाजन आणि त्यांचे कुटुंबीयही नेपाळमध्ये अडकले होते. मात्र, त्यांनी स्वतः संपर्क साधून एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.

नागपूरमधील 106 प्रवासी काठमांडूहून सुखरूप रवाना झाले आहेत. मात्र, ठाण्यातील 9 पर्यटकांशी अद्याप संपर्क झालेला नाही. ठाणे जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांसह नेपाळ प्रशासनाच्या संपर्कात आहे. तसेच रायगडमधील 37 नागरिक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती आहे.

नेपाळमध्ये अचानक महापूर का आला?

नेपाळमधील या भीषण पुरामागे ग्लेशियर कोसळण्याची घटना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तरेकडील उतारावर सुमारे 5,200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा काही भाग तुटून सुमारे 1,200 मीटर खाली दरीत कोसळला.

बर्फ आणि दगडांचा मोठा भाग ल्हेंदे खोला नदीत कोसळल्याने नदीचा प्रवाह अडला आणि तात्पुरता बांध तयार झाला. हा बांध फुटल्यानंतर पाणी, चिखल, दगड आणि मोठ्या प्रमाणातील मलब्याची प्रचंड लाट वेगाने खालच्या दिशेने वाहू लागली.

ल्हेंदे खोला ही तिबेटमधून वाहत येणारी उपनदी असून, नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी आणि तिमुरे परिसरात ती भोटेकोशी नदीला मिळते. ग्लेशियर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीने नदीच्या प्रवाहात अचानक मोठी वाढ झाली आणि त्यानंतर परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली.

Nepal Floods Marathi News

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात