विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकार दहीहंडी या राज्याच्या पारंपारिक खेळाचा ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. Dahi Handi in the Olympic
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये ‘प्रो गोविंदा लीग’च्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन केले. या लीगचा चौथा हंगाम 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 16 संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार असून विजेत्याला 1.89 कोटी रुपयांचे एकूण बक्षीस मिळणार आहे. या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.
“महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची खास ओळख असलेल्या दहीहंडी या साहसी खेळाचा आगामी काळात एशियाड, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
“गोकुळाष्टमीच्या निमित्ताने साजरी होणारी दहीहंडी ही समाजाला एकत्रित करून सामाजिक अभिसरण घडवणारी परंपरा आहे. तरुणांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देत, खांद्याला खांदा लावून मानवी मनोरे रचत ही हंडी फोडली जाते. यामध्ये जमिनीवर पाय रोखून उभा राहणारा गोविंदा असो किंवा सर्वात वरती चढून हंडी फोडणारा गोविंदा, प्रत्येक स्तरावरील घटकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळामध्ये टीम स्पिरिट आणि संघभावना हीच सर्वात मोठी ताकद आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले.
“राज्य सरकारने याआधीच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. आता हा साहसी खेळ जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी अखिल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांची मान्यता मिळवणे गरजेचे आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. “हा खेळ सामान्य खेळाडू खेळू शकत नाही, यासाठी उत्तम चॅम्पियन्सची गरज असते,” असे कौतुक करत त्यांनी सहभागी सर्व गोविंदा पथक आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, वरळी डोम येथे दिमाखात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गोविंदा पथके उपस्थित होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App