महाराष्ट्रात हिंसक घटना : मेंढ्यांच्या कळपात वाघाची झाली शेळी; गुरगुरणे सोडले उलट धर्मनिरपेक्षतेचे म्याव म्याव


अभिजित अकोळकर

त्रिपुरातील घटनेनंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. मुस्लिम धर्मांधांनी पुन्हा डोके वर काढले असताना मेंढ्यांच्या कळपात वाघाची शेळी झाल्याचे उघड झाले आहे. गुरगुरणे तर त्याने केव्हाचे सोडले असून उलट धर्मनिरपेक्षतेचे म्याव म्याव आता सुरु आहे. पण, वाघाची एक डरकाळी परिस्थिती आटोक्यात आणू शकते. वाघाने एक डरकाळी फोडावी आणि हा धुडगूस आणि हिंसाचार रोखावा.Violent incidents in Maharashtra

ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, अशी धर्मनिरपेक्षतेची कातडी पांघरलेल्या वाघाची स्थिती झाली आहे. कट्टरवादी रझा अकादमी रस्त्यावर उतरून धुडगूस घालत असताना वाघ हा बारामतीच्या गुहेत शांत का बसला आहे. एरवी धर्मनिरपेक्षतेची गोडवी गाणारी मंडळी आता कोठे लपून बसली आहेत. एरवी टुकार ट्विटवर आणि आपल्या सोयीच्या हिंसाचारावर बोलणाऱ्या साहित्यिकांचे कंठ आता का दाटून आले आले आहेत ? अर्थांत पूर्वीप्रमाणे दर्जेदार साहित्यिकच महाराष्ट्रात राहिले नाहीत. तसेच राजकीय जोडे काढून संमेलनात या म्हणणाऱ्या दुर्गा भागवत यांच्या सारख्या सडेतोड बोलणाऱ्या साहित्यिक नाहीत.

भर कार्यक्रमात तेलाचे भाव कमी झाले तर बरे होईल, असे सरकारला ठणकावणारे पु. ल. देशपांडे नाहीत. साहित्य संमेलनात लामण दिवे लावतात. त्याचा प्रकाश तेवढ्यापुरताच मर्यादित का राहतो आहे. संमेलनात एकमेकांचे कौतुक सोहळे रंगतात. २५ लाखांचा चुराडा होतो. ते एक राजकीय व्यासपीठ होते. या परंपरा ही आता तोडायला हव्या आहेत. सरकारी पैशावरची साहित्य संमेलने राजकीय पक्षांच्या दावणीला बांधली जात आहे. नोबेल जाऊ द्या. पण, राष्ट्रीय पातळीवर एका तरी साहित्यिकाचा सध्याच्या काळात सन्मान झाला आहे का ? याचा अर्थ दर्जेदार साहित्य मराठीत निर्माणच होत नाही. ज्यांच्या पायावर डोके ठेवायचे असे साहित्यिकच आता दिसत नाहीत. जनता उगीच कट्टपाच्या रुपात बाहुबली स्टाईलने साहित्यिकांचे पाय डोक्यावर घेते आहे.


खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी; संजय राऊत, आनंद अडसूळ यांच्यावर संशय व्यक्त


एकंदरीत राज्यातील हे हिंसक चित्र अयोग्य आहे. त्यावर कोणी सडेतोड बोलायला तयार नाही. राज्य सरकार तोंड मिटून बसले आहे. कठोर कारवाई का करत नाही. राजकीय हितापेक्षा महाराष्ट्राचे हित अधिक महत्वाचे आहे. वाघाची एक डरकाळी परिस्थिती आटोक्यात आणू शकते. वाघाने डरकाळी फोडावी आणि हा धुडगूस आणि हिंसाचार रोखावा.

राज्य सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडाले असून चरस, गांजा यावर अधिक चर्चा होते. जनतेच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा होत नाही. कोरोनामुळे पिचलेल्या जनतेला कोणी वाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यात कमी होत नाहीत. केंद्राला जमते. इतर राज्यांना जमते तर महाराष्ट्राला का जमत नाही. जनतेचे प्रश्न सोडून इतर विषयावर जास्त चर्चा करण्यात पुढारी मग्न आहेत. राज्यात पुढाऱ्यांवर विविध गैरव्यवहारामुळे धाडी पडत असताना त्यांनी पदाचे राजीनामे द्यायला हवेत. चौकशीत ते निर्दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे. हे त्यांनी विसरता कामा नये.

लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर असतात. ही बाब जनता कशी काय विसरत आहे. एखाद्या भ्रष्ट लोकप्रतिनिधीला परत बोलाविण्याचा अधिकार जनतेला मिळाला पाहिजे. राज्यात लोकायुक्त नेमले पाहिजेत. राजकीय मंडळी भ्रष्टाचार करणार, उजळ माथ्याने फिरणार आणि एखादी समिती त्यावर निर्णय देणार हे कसे आणि किती दिवस चालणार ? जनतेचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे.धर्मांध व्यक्ती, समुह रस्त्यावर उतरून दगडफेक करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. त्यांना दयामाया दाखविणे महागात पडणार आहे. उपदेशाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे डोस हे प्रथम मुस्लिम धर्मांधांना आधी पाजले पाहिजेत. शांततेत जीवन व्यतिथ करणाऱ्या लोकांना उपदेश देण्याचे प्रकार आता फार काळ चालणार नाहीत. सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा आणि संयमाचा उद्रेक होईल तेव्हा धर्मांध, माथेफिरू पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडून जातील. शिवाय अकारण त्रास झाल्याने मतपेटीतून भविष्यात सत्ता उलथवून टाकल्याशिवाय ते राहणार नाहीत. एवढे मात्र खरे. आता जनतेनेच या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

हिंदूंनी आपले हित ओळखावे

जनतेने विशेषतः हिंदूंनी आपले हित कशात आहे. कोण आपले हित पाहणारा आहे, याचा विचार करायला आतापासून सुरुवात करावी. तीन दिशेला तीन तोंडे असणाऱ्या आणि खिचडी पक्षाच्या राजकारणातून आणि जोखडातून मुक्त होण्याचा विचार अग्रक्रमाने जनतेने करावा. यातच त्यांचे हित आहे. २०१४ आणि २०१९च्या लोकसभेत ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जसे भाजपचे भक्कम सरकार जसे निवडून दिले तसेच सरकार राज्यात निवडून दिले तर मुस्लिम धर्मांधांच्या नांग्या आपोआप आवळल्या जातील. शांततेत जीवन जगण्याचा हा एकच मार्ग सध्या दिसत आहे. असे राज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा!

Violent incidents in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय